रत्नागिरी : मोफत आरोग्य शिबिराचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
रत्नागिरी, 20 डिसेंबर, (हिं. स.) : राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन श्री. सामंत यांच्या हस्ते झाले. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, ज्युपिटर हॉस
रत्नागिरीत मोफत आरोग्य शिबिर


रत्नागिरी, 20 डिसेंबर, (हिं. स.) : राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन श्री. सामंत यांच्या हस्ते झाले.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, ज्युपिटर हॉस्पिटल (ठाणे), अथायू हॉस्पिटल (कोल्हापूर), उदय सामंत वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन, आरोग्यदूत फाऊंडेशनतर्फे हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

उद्घाटनानंतर श्री. सामंत यांनी उपस्थित नागरिक, रुग्ण व शिवसैनिकांशी संवादही साधला.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande