
परभणी, 20 डिसेंबर (हिं.स.)।
पूर्णा येथील नगरपालिकेच्या दोन प्रभागाच्या निवडणूकीसाठी शनिवारी(दि. २०) मतदान सुरळीत व शांतपणे पार पडले. उद्या रविवारी सकाळी दहा वाजता मतमोजणी होणार असल्याची माहिती तहसिलदार तथा निर्वाचन अधिकारी माधवराव बोथीकर यांनी दिली.
नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एक (ब) व प्रभाग क्रमांक दहा (ब) साठी शनिवारी सकाळी साडेसात ते साडेपाच या वेळेत प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले. एकूण ७०९२.% मतदान झाले असून मतदान प्रक्रिया सुरळीतपणे व शांतपणे पार पडली. उद्या तहसील कार्यालयात सकाळी दहा वाजता मतमोजणी होईल. नगरसेवक पदासाठी ११२ उमेदवाराची तर नगराध्यक्ष पदासाठीच्या १४ उमेदवाराचे भवितव्य उद्या मतदान यंत्रातून बाहेर पडणार आहे. त्यामुळे कोण नगराध्यक्ष पदाची बाजी मारणार? हे स्पष्ट होणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी सहाय्यक निर्वाचन अधिकारी प्रशांत थारकर, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार पंढरीनाथ शिंदे, प्रशिक्षणार्थी तहसिलदार माधव गंगावणे , नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे, रामराव पवार, नंदलाल चावरे, व्यंकटेश यजरवार आदींनी परिश्रम घेतले. तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. समाधान पाटील, पोलिस निरीक्षक विलास गोबाडे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis