कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या ज्युबली फंडच्या वापरावरून अभाविपचे आंदोलन
कोल्हापूर, 20 डिसेंबर (हिं.स.)। शिवाजी विद्यापीठाच्या ज्युबली फंडचा वापर संशोधनासाठी करावा या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे विदयापीठाच्या प्रवेशद्वारात आंदोलन केले. त्यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलीस, सुरक्षारक्षक यांच्यात वादावादी आणि ध
शिवाजी विद्यापीठात अभाविपचे आंदोलन


कोल्हापूर, 20 डिसेंबर (हिं.स.)। शिवाजी विद्यापीठाच्या ज्युबली फंडचा वापर संशोधनासाठी करावा या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे विदयापीठाच्या प्रवेशद्वारात आंदोलन केले. त्यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलीस, सुरक्षारक्षक यांच्यात वादावादी आणि धक्काबुक्की झाली. पोलीस आणि सुरक्षारक्षकांनी मारहाण केली असल्याचा आरोप आंदोलनकर्ते यांनी केला. त्याचे पडसाद सिनेट सभेत उमटले. सिनेट सदस्यांनी या मारहाणीच्या घटनेचा निषेध केला.

शिवाजी विद्यापीठांतर्गत सर्व संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांकडून 'ज्युबली फंड' अंतर्गत प्रतिविद्यार्थी २५ रुपये शुल्क आकारले जाते. हा निधी संबंधित महाविद्यालयांच्या रौप्य, सुवर्ण व अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांसाठी वापरण्यात येतो. मात्र, दरवर्षी गोळा होणाऱ्या या निधीचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी नेमका काय उपयोग होतो, याबाबत एबीव्हीपीने शंका उपस्थित केली आहे. याच पार्श्वभूमीवर माहिती विचारण्यासाठी गेले असता ही झटापट झाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) विद्यार्थी कार्यकर्त्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. यावेळी पोलिस प्रशासन आणि विद्यापीठाच्या सुरक्षारक्षकांकडून आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला. आंदोलनादरम्यान पोलिस व विद्यार्थ्यांमध्ये जोरदार झटापट झाली असून काही काळ विद्यापीठ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाची रीतसर चौकशी करून कार्यवाही करण्याची ग्वाही प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी दिली.

विद्यार्थी मुख्य इमारतीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी पोलिस व आंदोलक आमनेसामने आल्याने धक्काबुक्की व झटापट झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

आंदोलक विद्यार्थ्यांनी पुढील प्रमुख मागण्या मांडल्या -दरवर्षी जमा होणाऱ्या ज्युबली फंडाचा विनियोग कसा केला जातो, तसेच महाविद्यालयांची विद्यार्थीसंख्या असमान असताना निधी वाटपाचे निकष कोणते ?

वर्षातून मोजक्याच महाविद्यालयांत महोत्सव होत असताना उर्वरित निधीचा वापर कशासाठी केला जातो?

या योजनेतून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वृद्धीस नेमका काय लाभहोतो ? हे स्पष्ट करावे.

रौप्य, सुवर्ण व अमृत महोत्सव हे संबंधित महाविद्यालयातील आजी-माजी विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने साजरे करावेत.

या फंडाच्या पर्यायाने पदवी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योज राबवून संशोधन वृत्ती वाढवता वाढवावी

जेआयआयच्या विद्यार्थ्यांनी या शुल्काला अन्यायकारक ठरवत, हा निधी विद्यार्थी विकास व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी वापरण्याची मागणी केली आहे. या घटनेनंतर विद्यापीठ प्रशासनाची भूमिका काय राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande