
अमरावती, 20 डिसेंबर (हिं.स.) | राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे विधान परिषदेचे आमदार संजय खोडके यांचा अमरावती शहरात अपघात झाला. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी जात असताना एका फोरव्हिलर वाहनाने त्यांना धडक दिल्याची माहिती आहे.
या अपघातात आमदार संजय खोडके यांच्या पायाला तसेच मणक्याला दुखापत झाली असून त्यांना तत्काळ उपचारासाठी अमरावती येथील रीम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. अपघाताची माहिती मिळताच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समर्थकांनी रुग्णालयात गर्दी केली आहे. या घटनेबाबत अधिक तपास सुरू असून नेमका अपघात कसा झाला याची चौकशी संबंधित यंत्रणांकडून केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी