नांदेड - महापालिकेत आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी पथकांच्या कार्यपध्दती बाबतचे प्रशिक्षण संपन्न
नांदेड, 20 डिसेंबर, (हिं.स.)। राज्य निवडणूक अयोगाच्या आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमबजावणीसाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या अधिपत्याखाली पालिका मुख्यालयात आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ७ भरारी पथके,
नांदेड - महापालिकेत आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी पथकांच्या कार्यपध्दती बाबतचे प्रशिक्षण संपन्न


नांदेड, 20 डिसेंबर, (हिं.स.)। राज्य निवडणूक अयोगाच्या आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमबजावणीसाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या अधिपत्याखाली पालिका मुख्यालयात आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ७ भरारी पथके, १५ स्थिर सर्व्हेक्षण पथक व ७ व्हिडीओ सर्व्हिलियंस पथकांची स्थापणा करण्यात आली असुन या सर्व पथकांचे संचलन आचारसंहिता कक्षातुन पार पाडण्यात येणार असुन पालिकेच्या मुख्य इमारतीत आचारसंहिता पथकांच्या कार्यपध्दती बाबत प्रशिक्षण कार्यशाळा पार पाडण्यात आली. या प्रशिक्षण कार्यशाळेस सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, आचारसंहिता कक्ष प्रमुख, सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व पथकातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

भरारी पथके व स्थिर सर्व्हेक्षण पथकांची पालिका प्रभागनिहाय नियुक्ती करण्यात आली असुन पथकात प्रत्येकी १ कार्यकारी दंडाधिकारी (पथक प्रमुख), १ पोलीस अधिकारी, १ व्हिडीओ ग्राफर यांचा समावेश असणार असुन त्याचबरोबर पथकात १ कार्यकारी दंडाधिकारी (पथकाचा प्रमुख), १ व्हिडीओ ग्राफर आणि १पोलीस कर्मचारी यांचा समावेश आहे.

या पथकांच्या माध्यमातुन लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५१ मधील विविध तरतुदी अन्वये कार्यवाही करण्यात येणार असुन त्यामध्ये प्रामुख्याने मतदारास लाच देणे / घेणे, गैरवाजवी दडपण, धर्म, वंश, जात, समाज अथवा भाषेच्या आधाराव व्देष निर्माण करणे, उमेदवाराच्या वैयक्तीक व चारित्र्या बाबत खोट्या बातम्या प्रसिध्द करणे, मतदारासाठी मतदान केंद्रावर जाण्या-येण्यासाठी उमेदवाराने वाहन पुरविणे त्याचप्रमाणे मतदारास धमकी देणे, तोतेयेगिरी, चारित्र्यहनन, खर्चा संदर्भात या सर्व बाबींवर करडी नजर असणार आहे.

या प्रशिक्षण कार्यशाळेस अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, उपविभागीय अधिकारी प्रविण मेनशेट्टी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज पांडे व वस्तु व सेवा कर विभागाचे शेवाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande