छ. संभाजीनगर - मंत्री सावे यांच्या उपस्थितीत भाजप इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती
छत्रपती संभाजीनगर, 20 डिसेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या वतीने भाजपा विभागीय कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या प्रक्
अ


छत्रपती संभाजीनगर, 20 डिसेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या वतीने भाजपा विभागीय कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

या प्रक्रियेदरम्यान उपस्थित उमेदवारांशी सविस्तर संवाद साधून त्यांची भूमिका, अनुभव आणि कार्यपद्धती जाणून घेतली.

संपूर्ण प्रक्रिया शिस्तबद्ध व सकारात्मक वातावरणात पार पडली.

जनतेला मिळणारा प्रतिनिधी हा जनतेला आपलासा वाटला पाहिजे, आपले कार्य पूर्ण करू शकेल हा विश्वास मतदारांमध्ये निर्माण झाला पाहिजे.. या भूमिकेतूनच उमेदवारांची निवड होणार आहे! असे मंत्री सावे यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande