कोल्हापूरातील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमला आंतरराष्ट्रीय मान्यता
कोल्हापूर, 20 डिसेंबर (हिं.स.)। कोल्हापूरमधील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनले आहे. ऑस्ट्रेलियातील फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल हॉकी असोसिएशन (FIH) ने येथे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय हॉकी सामने आयोजित करण्यासाठी अधिकृत मान्यता दिल
कोल्हापूरमधील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम


कोल्हापूर, 20 डिसेंबर (हिं.स.)।

कोल्हापूरमधील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनले आहे. ऑस्ट्रेलियातील फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल हॉकी असोसिएशन (FIH) ने येथे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय हॉकी सामने आयोजित करण्यासाठी अधिकृत मान्यता दिली आहे. 15 नोव्हेंबर रोजी फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल हॉकी असोसिएशनच्या शिष्टमंडळाने स्टेडियमची तपासणी केली होती आणि त्यानंतर आज महापालिकेला FIH चे मानांकन प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

हे स्टेडियम बांधण्यापासून तेथे आवश्यक खेळाडूंना सर्व सुविधा, सराव, यासह हे स्टेडियम आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे यासाठी हॉकी खेळाडू, माजी नगरसेवक विजय साळोखे -सरदार यांनी गेली अनेक वर्षे सातत्याने प्रयत्न केले. आज याबाबत FIH कडून प्रमाणपत्र प्राप्त झाले आणि खेळाडू, हॉकी प्रेमी यांनी मैदानात येऊन मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी विजय साळोखे सरदार यांनी आता कोल्हापूरात हॉकी खेळ आणि खेळाडू यांचा चांगला विकास व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करून या साठी सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानले.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande