निफाड चे तापमान 4.5 अंशा वरती
नाशिक, 20 डिसेंबर (हिं.स.)। निफाड तालुक्यात शनिवारी कडाक्याची थंडी अनुभवण्यास मिळाली. येथे पारा ४.५ अंश सेल्सिअस या हंगामातील नवीन नीचांकी पातळीवर पोहोचला असून हे राज्यातील सर्वात कमी तापमान असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नाशिक शहरातही ६.९ अंश त
निफाड चे तापमान 4.5 अंशा वरती


नाशिक, 20 डिसेंबर (हिं.स.)। निफाड तालुक्यात शनिवारी कडाक्याची थंडी अनुभवण्यास मिळाली. येथे पारा ४.५ अंश सेल्सिअस या हंगामातील नवीन नीचांकी पातळीवर पोहोचला असून हे राज्यातील सर्वात कमी तापमान असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नाशिक शहरातही ६.९ अंश तापमानाची नोंद झाली. थंडीच्या तीव्र लाटेमुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे.

निफाड आणि नाशिक शहराच्या तापमानात साधारणतः दोन ते तीन अंशांचा फरक कायम असतो. शनिवारी नाशिकमध्ये पारा ६.९ अंशांपर्यंत खाली घसरला. जो या हंगामातील नीचांक ठरला. याआधी नाशिकमध्ये गेल्या शुक्रवारी ७.८ अंश तापमानाची नोंद झाली होती. सातत्याने घसरणाऱ्या या पाऱ्यामुळे जिल्ह्यात हुडहुडी भरली असून नागरिकांना दिवसाही उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. हिवाळ्यात नाशिक जिल्ह्यात निफाडचे तापमान सर्वात कमी राहण्यामागे अनेक भौगोलिक कारणे असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande