रत्नागिरी : नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाच्या विजेत्यांविषयीची उत्कटता शिगेला
रत्नागिरी, 20 डिसेंबर, (हिं. स.) : जिल्ह्यातील चार नगरपालिका आणि तीन नगर पंचायतींमध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदावर कोण विजयी होणार, याविषयीची उत्कटता शिगेला पोहोचली आहे. जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण, राजापूर आणि खेड या नगरपालिका आणि लांजा, देवरूख
रत्नागिरी : नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाच्या विजेत्यांविषयीची उत्कटता शिगेला


रत्नागिरी, 20 डिसेंबर, (हिं. स.) : जिल्ह्यातील चार नगरपालिका आणि तीन नगर पंचायतींमध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदावर कोण विजयी होणार, याविषयीची उत्कटता शिगेला पोहोचली आहे.

जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण, राजापूर आणि खेड या नगरपालिका आणि लांजा, देवरूख आणि गुहागर नगर पंचायतीची सार्वत्रिक निवडणूक गेल्या २ डिसेंबर रोजी झाली. न्यायालयीन प्रक्रियेमुळे रत्नागिरीतील एका प्रभागासह राज्यातील काही प्रभागांमधील निवडणूक लांबणीवर पडली. तेथील निवडणूक आज पार पडली. उद्या, दि. २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. प्रत्येक शहरांमध्ये मतमोजणीसाठी निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. सर्वच ठिकाणी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. पहिल्या सुमारे दोन तासांत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुपारी बारा वाजेपर्यंत सर्वच ठिकाणचे चित्र स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, रत्नागिरी शहरातील प्रभाग १० मधील निवडणूक आज शांततेत पार पडली. दोन जागांसाठी ही निवडणूक झाली. तेथे एकूण ४९.७८ टक्के मतदान झाले. प्रभागातील २०७९ पुरुष आणि २०६५ महिला अशा एकूण ४१४४ मतदारांपैकी १०८१ पुरुष आणि ९८२ महिला अशा एकूण २०६३ मतदारांनी मतदानाचा आपला हक्क बजावला.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande