
रत्नागिरी, 20 डिसेंबर, (हिं. स.) : संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने संगमेश्वर येथील प२सा फंड इंग्लिश स्कूलमध्ये आज प्लास्टिकमुक्त शाळा अभियान राबवण्यात आले.स्वच्छतेचा वसा संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांनी घालून दिला, असे श्री संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करून प्रशालेमध्ये स्वच्छता आणि पर्यावरण, प्लास्टिक आणि पर्यावरण याविषयी मुलांना माहिती देण्यात आली.
प्लास्टिक हे पर्यावरणाला कसे घातक आहे, त्यामध्ये पर्यावरणाचे नुकसान तसेच होणारे जल, वायू, माती प्रदूषण, आरोग्यावर होणारे परिणाम, श्वसनाचे होणारे आजार, बारीक कणांमुळे होणारे विविध आजार यावर प्रशालेच्या शिक्षिका सौ. अमृता कोकाटे यांनी माहिती दिली. गाडगेबाबांनी आजपर्यंत केलेला त्यांच्या कार्याविषयी मुलांना जाणीव करून देण्यात आली व त्यांचा स्वच्छतेचा वारसा तसाच जर पुढे चालू ठेवला आणि पर्यावरणामध्ये स्वच्छता ठेवली तर नक्कीच भविष्यातील होणाऱ्या अडचणींवर मात करता येईल व होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवता येईल याची विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. खोचरे, दळवी यांनी विद्यार्थ्यांकडून परिसरात स्वच्छता अभियान राबवले. यावेळी संस्थेचे सचिव धनंजय शेट्ये व प्रशालेचे मुख्याध्यापक खामकर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी