जळगाव - रासायनिक खते काळ्या बाजारात नेणाऱ्या ट्रकवर कारवाई
जळगाव, 20 डिसेंबर, (हिं.स.) भडगाव शहरातील स्वामी ऍग्रो या किरकोळ कृषी केंद्र चालकाने विनापरवाना अनाधिकृत रसायनिक खताची नाशिक जिल्ह्यातील एका कृषी सेवक केंद्रास बेकायदेशीरपणे कोणत्याही बिलाशिवाय कोणत्याही ऑनलाईन नोंदणी शिवाय विक्री करिता ट्रक द्वारे
जळगाव - रासायनिक खते काळ्या बाजारात नेणाऱ्या ट्रकवर कारवाई


जळगाव, 20 डिसेंबर, (हिं.स.) भडगाव शहरातील स्वामी ऍग्रो या किरकोळ कृषी केंद्र चालकाने विनापरवाना अनाधिकृत रसायनिक खताची नाशिक जिल्ह्यातील एका कृषी सेवक केंद्रास बेकायदेशीरपणे कोणत्याही बिलाशिवाय कोणत्याही ऑनलाईन नोंदणी शिवाय विक्री करिता ट्रक द्वारे वाहतूक करताना चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर येथे कृषी विभागाच्या भरारी पथकास तपासणी दरम्यान आढळले म्हणून भडगाव पोलीस स्टेशनला याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ट्रक मध्ये सुमारे ईफको कंपनीचा युरीयाचे बैंग २५ टन,प्रत्येक बॅग ४५किलो प्रमाणे एकुण ५५० बॅग असुन सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल भडगाव पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी- दिगंबर रामभाऊ तांबे,(वय २९वर्ष) धंदा-नोकरी तालुका गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, द्वारा तालुका कृषि अधिकारी कार्यालय भडगाव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मला जिल्हा स्थरीय भरारीय पथकातील पद्मनाभ म्हस्के, कृषी विकास अधिकारी जिल्हा परीषद, जळगाव आणि विकास बोरसे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक यांच्याकडून गुप्त बातमी प्राप्त झाली की, भडगाव येथून रसायनिक खतांची अवैधपणे वाहतूक करणारा ट्रक भडगाव येथून निघालेला असून तो काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणार असल्याची माहिती मिळाल्यावर भडगाव शहरापासुन पाठलाग सुरु केल्यानंतर कजगाव गावापासुन आमच्या शासकीय वाहनामधील टिम व माझी दुचाकी वाहनावरील टिम अशांनी संबंधीत ट्रकचा पाठलाग सुरुच ठेवला होता. सदरील ट्रक हे कजगाव वरुन चाळीसगाव मार्गे हिरापुर गावा नजीकच्या साईनाथ भारत पेट्रोल पंपाजवळ सांयकाळी ७ वाजेच्या सुमारास अडविला. व त्यास आमची ओळख करून दिली व त्यानंतर सदर ट्रकवरील ड्रायव्हर यास विचारणा केली की, तुमच्या ट्रक मध्ये कोणते माल आहे? तसेच तुझे नाव काय आहे, असे विचारल्यानंतर त्यांने त्याचे नाव नाजीम रहीम शिसगर (वय ४३ वर्ष), धंदा ड्रायव्हर, रा. हनुमान नगर, ता. चांदवड, जि.नाशिक, त्याने सांगितले की, सदर टूक मध्ये रासायनिक खते आहे. त्यानंतर त्यांना विचारले की, तुमच्याकडे सदर रासायनिक खताचे बिल, डिलीवरी चलन तसेच परवानगी आहे का? यावर संबंधीत चालक यांच्याकडे कोणते बिल, डिलीवरी चलन व परवानगी नसल्याबाबत सांगितले. त्यानंतर संबंधीत चालक यास विचारले की, संबंधीत माल तुम्ही कोणत्या ठिकाणावरुन भरला आहे. त्यावर त्यांनी सांगितले की, भडगाव येथील स्वामी ऍग्रो येथून ईफको कंपनीचा युरीयाचे बैंग २५ टन, माल भरला असल्याचे सांगितले. त्यानंतर आम्ही सदर ट्रक मधील जो काही भरलेला माल होता तो उघडुन पाहीला असता, त्यामध्ये ईफको कंपनीचा युरीयाचे बैंग २५ टन, प्रत्येक बॅग ४५कि. लो असुन, एकुण ५५० बॅग असुन त्यांची किंमत १४६३००/- रु. सदर दुकान विक्रेता याने स्वताचे फायद्यासाठी किरकोळ विक्रेता असतांना सुध्दा नमुद रासायनिक युरीया खाताचे साठवणुक करुन, स्वताचे फायद्यासाठी काळाबाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने मिळुन आला म्हणून भडगाव पोलीस स्टेशनला आरोपी १) नाजीम रहीम शिसगर, वय 43 वर्ष, चंदा ड्रायव्हर, रा. हनुमान नगर, ता. चांदवड, जि. नाशिक, २) स्वामी अँग्रो सेवा केंद्राचे मालक भडगाव, पुर्ण नाव माहीती नाही.३) एक अज्ञात इसम विरूद्ध – गुरन ४६५/२०२५ अत्यावश्क वस्तु कायदा १९५५चे कलम ३, ७ तसेच खत नियत्रंण आदेश १९८५ मधील कलम ७,८,१९,२४,२५,२६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश शर्मा हे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande