परभणी : बावनकुळेंनी दिला भाजप कोअर कमिटीच्या सदस्यांना कानमंत्र
परभणी, 20 डिसेंबर (हिं.स.)। महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकांच्या पार्श्‍वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवार 20 डिसेंबर रोजी परभणीच्या आपल्या मॅराथॉन दौर्‍यात भारतीय जनता पार्टीच्या आजी-माजी लोकप्रतिनिधींसह कोअर कमिटीच्या
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप कोअर कमिटीच्या सदस्यांना दिला निवडणूकीचा कानमंत्र


परभणी, 20 डिसेंबर (हिं.स.)। महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकांच्या पार्श्‍वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवार 20 डिसेंबर रोजी परभणीच्या आपल्या मॅराथॉन दौर्‍यात भारतीय जनता पार्टीच्या आजी-माजी लोकप्रतिनिधींसह कोअर कमिटीच्या सदस्यांना निवडणूकीतील हमखास विजया करीता कानमंत्र दिला.....

महसूलमंत्री बावनकुळे हे शनिवारी सायंकाळी 4.30 वाजता हेलिकॉप्टरद्वारे परभणीत दाखल झाले. वसमत रस्त्यावरील भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे अत्यंत घाईगडबडीत उद्घाटन केल्यानंतर ते औद्योगिक वसाहतीतील हॉटेल फन च्या सभागृहात ताफ्यानिशी दाखल झाले. या ठिकाणी महापालिका निवडणूकीच्या अनुषंगाने आजी-माजी लोकप्रतिनिधी व कोअर कमिटीच्या सदस्यांची व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यास जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर, ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरेश वरपुडकर, विभागीय संघटनमंत्री संजय कौंडगे यांच्यासह ज्येष्ठ नेते विजय वरपुडकर, उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर, महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी महसूल मंत्री बावनकुळे यांनी महानगरपालिकेच्या निवडणूका महत्वपूर्ण आहेत, त्यामुळे या निवडणूका प्रत्येकाने गांभीर्याने घ्याव्यात, या निवडणूकीत आपणास हमखास यश मिळवायचं आहे, त्या दृष्टीने अनुकूल असे वातावरण आहे, त्या गोष्टीचा आपण निश्‍चितच लाभ उचलला पाहिजे, त्यासाठी अंतर्गत मतभेद प्राधान्याने दूर ठेवले पाहिजेत, निवडणूकीच्या रिंगणात मेरीट बेसच्या निकषावरच उमेदवार उतरविले पाहिजेत, उमेदवार निवडीत तो माझा, तो परक्याचा वगैरे विषय असता कामा नये. प्रत्येक प्रभागात कोण उमेदवार असावेत, या दृष्टीने पक्षानेसुध्दा खाजगी एजन्सी मार्फत सर्वे केला आहे, सर्वे सुरु आहे. त्या सर्वेतून सुध्दा प्रभावी अशा उमेदवारांची नावे पुढे येतील, स्थानिक नेतेमंडळी सुध्दा त्या त्या प्रभागातील एकंदरीत गणिते, समिकरणे ओळखून सर्व समावेश अशा उमेदवारांची निवड करतील, असा विश्‍वास व्यक्त केला.

उमेदवारी वाटपात मेरीट बेस असणार्‍यांना डावलले जाणार नाही, उमेदवारी न मिळालेल्या कार्यकर्त्यांवर नाराजीचा प्रसंग येईल परंतु, या नाराज कार्यकर्त्यांची स्थानिक नेतृत्वाने गाठी भेटी घेऊन नाराजी दूर केली पाहिजे, हे नाराज इच्छुक बंडखोरी करणार नाहीत, हे प्राधान्याने पाहिले पाहिजे, असे नमूद करीत महसूलमंत्री बावनकुळे यांनी निवडणूकीच्या रिंगणात शक्यतो 30 ते 45 या वयोगटातील कार्यकर्त्यांनाच प्राधान्याने संधी द्या, एक एक मत महत्वाचे आहे, हे ओळखून मोर्चेबांधणी करा.

प्रत्येक प्रभागात छोटेखानी बैठका प्राधान्याने घ्या, किमान 20 जणांच्या या बैठका असल्या पाहिजेत, त्यातून स्थानिक पातळीवरील यंत्रणा कार्यान्वित झाली पाहिजे. भाजपाशी संबंधित समविचारी पक्ष, संघटना, संस्थांच्या पदाधिकार्‍यांच्यासुध्दा गाठीभेटी घेतल्या पाहिजेत. त्यांचा सक्रिय पाठींबा घेतला पाहिजे, हमखास विजयाकरीता आणखी काय करता येईल, या गोष्टींचाही अभ्यास केला पाहिजे, असे ते म्हणाले.

यावेळी माजी नगरसेवक मधुकर गव्हाणे, बाळासाहेब जाधव, माजी नगरसेवक राजेश देशपांडे, श्रीधर देशमुख, मोहन कुलकर्णी, रितेश जैन, संजय कुलकर्णी, शंकर आजेगांवकर, सुशील देशमुख, अभिषेक वाकोडकर, सौ. मंगल मुदगलकर, भालचंद्र गोरे, कमलकिशोर अग्रवाल, अनुप शिरडकर, अग्रवाल, भिमराव वायवळ, दिनेश नरवाडकर, इशांत देशपांडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande