त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी परिक्रमेची सांगता
त्र्यंबकेश्वर , 20 डिसेंबर (हिं.स.)।येत्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येथून 6 डिसेंबर रोजी निघालेल्या गोदावरी परिक्रमेची सांगता येथे भक्तिमय वातावरणात करण्यात आली.सनातन धर्माचा, विश्वकल्याणाचा संदेश देणे साठी परिक्रमेचे आयोजन सांगता झाली
त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी परिक्रमेची सांगता.सनातन धर्म, विश्व कल्याणाचा संदेश गोदावरी परिक्रमेतून दिला. श्रीमदजगद्गुरु द्वाराचार्य श्री स्वामी राजेंद्रदास


त्र्यंबकेश्वर , 20 डिसेंबर (हिं.स.)।येत्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येथून 6 डिसेंबर रोजी निघालेल्या गोदावरी परिक्रमेची सांगता येथे भक्तिमय वातावरणात करण्यात आली.सनातन धर्माचा, विश्वकल्याणाचा संदेश देणे साठी परिक्रमेचे आयोजन सांगता झाली असे श्रीमदजगद्गुरु द्वाराचार्य श्री स्वामी राजेंद्रदास यांनी या प्रसंगी सांगितले.

अनंत विभूषित श्रीमदजगद्गुरु द्वाराचार्य श्री अग्रपिठाधीश्वर एवंममूलक पीठाधीश्वर परमपूज्य स्वामी राजेंद्रदास देवाचार्य महाराज ( श्री रेवासा वृंदावन धाम) यांचे प्रेरणेने वरील नियोजन करण्यात आले होते. वैष्णव साधूंचे 500 साधू सहभागी होते. गोदावरी चे पूजन आरती आणि गोदावरीला महा वस्त्र वाहत गोदावरीचा जयजयकार करीत विश्व कल्याणाचे प्रार्थना करून गोदावरीची परिक्रमेचे सांगता त्रंबकेश्वर गोदावरीच्या उगमस्थानी कुशावर्ततीर्थावर झाली. गंगापूजन पौरोहित्य मुख्य पूजन लक्ष्मीकांत थेटे तसेच सहकारी महेंद्र थेटे, रतीश थेटे यांनी केले. पाच राज्यातूनही गोदावरी राजमहेंद्री समुद्रास मिळते येथून पुन्हा त्रंबकेश्वर असा सोळा दिवसांचा प्रवास झाला. सनातन धर्म वाढीस लागावा विश्वकल्याण व्हावे असा संदेश यात्रेतून दिला असे मुलाखतीत मुख्य महंत स्वामी राजेंद्र दास यांनी सांगितले. तीर्थ स्नान गंगा मंदिर दर्शन त्रंबकेश्वर मंदिर दर्शन आणि कार्शिनी गुरु आश्रमात शालिग्राम पूजन देखील झाले. रमण रेती वाले कार्शिनी गुरु आश्रमात सोहळा झाला. परिक्रमेत सामील बैरागी साधूंचे त्र्यंबकेश्वर पुरोहित संघ त्रंबकेश्वर देवस्थान यांच्यावतीने विश्वस्त मनोज थेटे यांनी तर त्र्यंबकेश्वर येथील साधू आखाडा यांचे वतीने महंत गणेशानंद सरस्वती महाराज यांनी स्वागत केले देवबाप्पा देखील उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande