
परभणी, 20 डिसेंबर, (हिं.स.)। सेलू पोलीस ठाण्यात दाखल प्रकरणातील फरार आरोपी ज्ञानेश्वर शंकर पवार (रा. गांधी नगर सेलू) यास स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने शनिवारी (दि. 20) नाशिक जिल्ह्यातील मनमाड रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले.
आरोपीच्या चौकशीदरम्यान त्याने दिलेल्या माहितीनुसार सेलू पोलीस ठाण्यात दाखल गुरनं 637/2025 मधील चोरीच्या प्रकरणाची उकल करण्यात पोलीस यशस्वी झाले. पुढील कारवाईसाठी आरोपीला सेलू पोलीसांच्या ताब्यात ठेवण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव केंद्रे, मधुकर चट्टे, निलेश भुजबळ, विलास सातपुते, गणेश कौटकर, किशोर चव्हाण, उत्तम हनवते, मधुकर ढवळे आणि उमेश चव्हाण यांच्या पथकाने केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis