
ठाणे, 20 डिसेंबर (हिं.स.) : बजरंग दल या विश्व हिंदू परिषदेच्या युवकांच्या संघटनेतर्फे रविवार दिनांक एकवीस ( २१ ) डिसेंबर रोजी दुपारी अडीच ( २.३०) ते साडे तीन (३.३०) दरम्यान ठाणे येथील श्रीराम व्यायाम शाळा तलावपाळी ते लोहाण समाज सभागृह खारकर आळी असे शौर्य संचलन आयोजित केले आहे. या शौर्य संचालनाच्या निमित्त हॊणाऱ्या मेळाव्याला पदमभूषण साध्वी ऋतंबरा मार्गदर्शन करणार आहेत.
बजरंग दल गीता जयंती आणि शौर्य दिनाच्या निमित्त दरवर्षी शौर्य संचलनाचे आयोजन करते, तरुणाईच्या आत्मविश्वासाचे जागरण, विधायक सामर्थ्याचे दर्शन आणि संघटित युवा शक्तीचा विवेकपूर्ण आविष्कार या हेतून शौर्य संचलन केले जाते. समाजासाठी उपयुक्त ठरणाऱ्या शौर्य संचलन उपक्रमात तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तसेच, पदमभूषण साध्वी ऋतंबरा यांचे भाषणाला यावे असे आवाहन बजरंग दलाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर