
पुणे, 21 डिसेंबर (हिं.स.)विजय हजारे ट्रॉफीच्या सुरुवातीच्या सामन्यांसाठी टीम इंडियाचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाड याची महाराष्ट्राच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विजय हजारे ट्रॉफीचा आगामी हंगाम २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. महाराष्ट्राने आपला संघ जाहीर केला असून, पहिल्या तीन सामन्यांसाठी ऋतुराजला कर्णधारपदी नियुक्त केले आहे. महाराष्ट्राचा संघ २४ नोव्हेंबर रोजी जयपूरमध्ये पंजाबविरुद्ध आपल्या स्पर्धेच्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. महाराष्ट्र एलिट ग्रुप सीचा भाग आहे.महाराष्ट्राव्यतिरिक्त, ग्रुप सी मध्ये सिक्कीम, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, मुंबई, छत्तीसगड आणि गोवा यांचा समावेश आहे.
महाराष्ट्राचा पहिला सामना पंजाबशी होईल. ऋतुराज संघाला विजयाकडे नेण्याचा प्रयत्न करणार आहे. या हंगामाच्या सुरुवातीपूर्वी महाराष्ट्र संघात सामील झालेले पृथ्वी शॉ आणि जलज सक्सेना यांचाही संघात समावेश आहे. सौरभ नवले आणि निखिल नाईक यांचा यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून समावेश करण्यात आला आहे. अंकित बावणे आणि राहुल त्रिपाठी ही संघातील इतर प्रमुख नावे आहेत.
महाराष्ट्र संघ (विजय हजारे करंडक)
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), पृथ्वी शॉ, अर्शिन कुलकर्णी, सिद्धेश वीर, अंकित बावणे, राहुल त्रिपाठी, सौरभ नवाले (यष्टीरक्षक), विकी ओस्तवाल, जलज सक्सेना, रामकृष्ण घोष, रजनीश गुरबानी, राजवर्धन हंगरगेकर, प्रवीण सोहळे (विकेटकीपर) प्रदीप दधे, सिद्धार्थ म्हात्रे, सचिन धस आणि सत्यजित बच्छाव.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे