दक्षिण आफ्रिका : जोहान्सबर्गमध्ये गोळीबारात 9 जणांचा मृत्यू
प्रिटोरिया, 21 डिसेंबर (हिं.स.)।दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग शहरात भीषण गोळीबाराची घटना घडली आहे. जोहान्सबर्गच्या बाहेरील परिसरात रविवारी पहाटे एका बार (टॅव्हर्न)मध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळीबार केला.या हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण
दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये गोळीबार


प्रिटोरिया, 21 डिसेंबर (हिं.स.)।दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग शहरात भीषण गोळीबाराची घटना घडली आहे. जोहान्सबर्गच्या बाहेरील परिसरात रविवारी पहाटे एका बार (टॅव्हर्न)मध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळीबार केला.या हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे.

ही घटना जोहान्सबर्गपासून सुमारे 40 किलोमीटर दक्षिण-पश्चिमेला असलेल्या बेकरसडाल भागात घडली. हा परिसर सोन्याच्या खाणींसाठी ओळखला जातो. हल्ला रात्री सुमारे 1 वाजता (2300 GMT) झाला. सुरुवातीला पोलिसांनी मृतांचा आकडा 10 असल्याचे सांगितले होते, मात्र नंतर तो दुरुस्त करून 9 करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या निवेदनानुसार, दोन वाहनांतून आलेल्या हल्लेखोरांनी दारूच्या अड्ड्यातील लोकांवर गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरून पळ काढताना देखील गोळीबार सुरू ठेवला. प्रांतीय पोलीस आयुक्त मेजर जनरल फ्रेड केकाना यांनी सांगितले की, मृतांमध्ये बारच्या बाहेर असलेला एक चालकही समाविष्ट आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच हल्लेखोर फरार झाले होते.पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केल्याचे सांगितले आहे. याआधी 6 डिसेंबर रोजी राजधानी प्रिटोरियाजवळील सॉल्सविल टाउनशिपमधील एका हॉस्टेलवर बंदूकधाऱ्यांनी हल्ला केला होता. या घटनेत तीन वर्षांच्या एका चिमुकल्यासह 12 जणांचा मृत्यू झाला होता. दक्षिण आफ्रिकेत या महिन्यातील ही दुसरी मोठी गोळीबाराची घटना आहे. या घटनेनंतर देशातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बेकर्सडाल टाउनशिपमध्ये बेकायदेशीररित्या दारू विकली जात असल्याची बाबही समोर आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande