भारतीय महिला संघाची पहिल्या टी-२० सामन्यात श्रीलंकेवर ८ विकेट्सने मात
विशाखापट्टणम, 22 डिसेंबर (हिं.स.)भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या टी-२० मध्ये भारताने ८ विकेट्सने सहज विजय मिळवला. भारताने फक्त २ विकेट्स गमावून १२२ धावांचे माफक लक्ष्य १४.४ षटकात पूर्ण केले. ३२ चेंडू शिल्लक असताना विजय मिळवणाऱ्या भारताने संपूर
जेमिमा रॉड्रिग्ज


विशाखापट्टणम, 22 डिसेंबर (हिं.स.)भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या टी-२० मध्ये भारताने ८ विकेट्सने सहज विजय मिळवला. भारताने फक्त २ विकेट्स गमावून १२२ धावांचे माफक लक्ष्य १४.४ षटकात पूर्ण केले. ३२ चेंडू शिल्लक असताना विजय मिळवणाऱ्या भारताने संपूर्ण सामन्यावर वर्चस्व गाजवले. महिला विश्वचषकापासून सातत्याने प्रभावी कामगिरी करणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्जने ४४ चेंडूत ६९ धावा करत भारताला विजय मिळवून दिला.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेने २० षटकात ६ विकेट्स गमावून १२१ धावा केल्या. त्यांची सुरुवात खराब झाली. कर्णधार चामारी अथापथ्थूला क्रांती गौडने फक्त १५ धावांवर बाद केले. त्यानंतर विश्मी गुणरत्नेने सर्वाधिक ३९ धावा केल्या, ४३ चेंडूंचा सामना करत एक चौकार आणि एक षटकार मारला. हर्षिता समरविक्रमाने २१ धावांचे योगदान दिले आणि हसिनी परेराने २० धावांचे योगदान दिले. शेवटी, विश्मी, निलक्षीका सिल्वा आणि कविशा दिलहारी यांच्यासह अनेक धावबाद झाले.भारतीय गोलंदाजी उत्कृष्ट होती. क्रांती गौड आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतलीी, तर दीप्ती शर्मालाही एका फंलादाजाला बाद करण्यात यश आलं. श्रीलंकेला फक्त १२१ धावा करता आल्या. पण भारताने येथे खूपच खराब क्षेत्ररक्षण केले आणि अनेक झेल सोडले.

१२२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, भारतीय संघाने उत्कृष्ट फलंदाजी केली. शफाली वर्माने जलद सुरुवात केली, ९ धावा केल्या, पण ती लवकर बाद झाली. स्मृती मानधना २५ धावा काढत बाद झाली. त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी कोणतीही चूक केली नाही. जेमिमाने ४४ चेंडूंचा सामना करत नाबाद ६९ धावा केल्या आणि एकही षटकार मारला नाही. जेमिमाने एकूण १० चौकार मारले. हरमनप्रीत १५ धावांवर नाबाद राहिली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद ५५ धावांची भागीदारी केली आणि संघाला आरामदायी विजय मिळवून दिला.श्रीलंकेच्या गोलंदाजीत इनोका रणवीरा आणि काव्या कविंदी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. पण त्यांना भारताला रोखता आले नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande