एमजी मोटरच्या कार्स महागणार; जानेवारी 2026 पासून 2 टक्के दरवाढ
मुंबई, 22 डिसेंबर (हिं.स.)। वर्ष 2025 संपत असताना वाहन उत्पादक कंपन्या आपल्या वाहनांच्या किमतींमध्ये बदल करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियाने आपल्या सर्व मॉडेल्सच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. कंपनीने स्पष्ट केले आहे क
MG Motor Cars


मुंबई, 22 डिसेंबर (हिं.स.)। वर्ष 2025 संपत असताना वाहन उत्पादक कंपन्या आपल्या वाहनांच्या किमतींमध्ये बदल करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियाने आपल्या सर्व मॉडेल्सच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. कंपनीने स्पष्ट केले आहे की 1 जानेवारी 2026 पासून एमजीच्या कार्सच्या किमतींमध्ये सरासरी 2 टक्क्यांची वाढ केली जाणार आहे. वाढती इनपुट कॉस्ट आणि इतर मॅक्रोइकॉनॉमिक कारणांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

एमजीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या MG Windsor EV च्या किमतीत सुमारे 30 हजार ते 37 हजार रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे या इलेक्ट्रिक कारची एक्स-शोरूम किंमत 14.27 लाख रुपयांपासून 18.76 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. त्याचप्रमाणे एमजीची सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक कार असलेल्या MG Comet EV च्या किमतीत 10 हजार ते 20 हजार रुपयांपर्यंत वाढ अपेक्षित असून, तिची एक्स-शोरूम किंमत 7.64 लाख ते 10.19 लाख रुपयांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, एमजीने अलीकडेच नवीन डिझाइनसह MG Hector फेसलिफ्ट भारतीय बाजारात दाखल केली आहे. या अपडेटेड मॉडेलमध्ये नवीन फ्रंट ग्रिल, नवीन इंटीरियर कलर थीम आणि आकर्षक अलॉय व्हील डिझाइन देण्यात आले आहे. इंटीरियरमध्ये 14-इंचाचा मोठा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, Apple CarPlay आणि Android Auto सपोर्ट, स्वाइप जेस्चर, 7-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, पॅनोरमिक सनरूफ, वायरलेस फोन चार्जर, ऑटोमॅटिक एसी तसेच वेंटिलेटेड आणि पावर्ड फ्रंट सीट्स यांसारखे आधुनिक फीचर्स मिळतात. MG Hector फेसलिफ्टची किंमत 11.99 लाख रुपयांपासून सुरू होऊन 18.99 लाख रुपयांपर्यंत आहे.

याशिवाय, अलीकडेच अपडेट करण्यात आलेल्या 7-सीटर MG Hector Plus ची एक्स-शोरूम किंमत 17.29 लाख ते 19.49 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. मात्र MG Hector चे डिझेल आणि 6-सीटर व्हेरिएंट्सच्या किमतींची अधिकृत घोषणा 2026 मध्ये केली जाणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

एमजी मोटरने केलेली ही दरवाढ सध्याच्या बाजारातील परिस्थिती लक्षात घेऊन करण्यात आली आहे. इतर वाहन उत्पादक कंपन्यांनीही अशाच प्रकारे किमती वाढवण्याचे निर्णय घेतले आहेत. Mercedes-Benz आणि BYD सारख्या कंपन्यांनीही चलनावरील दबाव आणि वाढत्या ऑपरेशनल खर्चामुळे जानेवारी 2026 पासून आपल्या वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande