जळगाव -सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी
जळगाव, 22 डिसेंबर (हिं.स.) मागच्या काही दिवसापासून सोने दरात चढ उतार कायम असून आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमतीने मोठी उसळी घेतल्याचं दिसून आले. आज सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १,१०० रुपयांनी वाढले आहेत. चांदी दरातही मोठी वाढ झालीय. च
संग्रहित लोगो


जळगाव, 22 डिसेंबर (हिं.स.) मागच्या काही दिवसापासून सोने दरात चढ उतार कायम असून आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमतीने मोठी उसळी घेतल्याचं दिसून आले. आज सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १,१०० रुपयांनी वाढले आहेत. चांदी दरातही मोठी वाढ झालीय. चांदीचा दर प्रति किलो ५ हजार रुपयांनी वाढला आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे. आज २४ कॅरेटचे दर प्रति तोळ्यामागे १,१०० रुपयांनी वाढले असून हे दर १,३५,२८० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ८८० रुपयांनी वाढले असून हे दर १,०८,२२४ रुपये झाले आहेत. २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १००० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,२४,००० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ८०० रुपयांनी वाढले असून ९९,२०० रुपये झाले आहेत. तर १० तोळ्याचे दर १२,४०,००० रुपये झाले आहेत. हे दर १०,००० रुपयांनी वाढले आहेत. सोन्यापाठोपाठ चांदी दरात तब्बल ५००० रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे आता चांदीचा एक किलोचा दर १,१९,००० रुपयांवर पोहोचला आहे.

--------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande