
अकोला, 25 डिसेंबर (हिं.स.)।बार्शीटाकळी येथे बंद पडलेल्या किसान जिनिंग येथे काही इसम अमली पदार्थ (ड्रग्स) तयार करीत असल्याची माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हे शाखा अकोला चे पथकाने त्या ठिकाणी रेड करून पाच आरोपी कडून मॅफेड्रॉन ड्रग्स 5548 किलो ग्रॅम तसेच त्याकरिता लागणारे केमिकल आणि साहित्य जप्त किंमती 2,38,000/ रुपये चे जप्त करून पोलीस निरीक्षक शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांचे रिपोर्ट वरून एकूण 5 आरोपींवर एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून तपासात घेतला होता. तेव्हा पकडलेले आरोपी यांना अजून पर्यंत मा. न्यायालया कडून जामीन न मिळाल्याने तें आजदेखील जेल मध्ये आहे हे विशेष
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक अकोला यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्याकडून सुरू आहे. सदर गुन्हयाच्या तपासात यातील अटक आरोपी जतिन जगमोहन दोषी रा. भांडुप मुंबई याच्यासोबत संगणमत करून फरार आरोपी मोहम्मद अशरफ मोहम्मद आझम राइन याने मॅफेड्रॉन ड्रग्स तयार करण्याकरता लागणारे केमिकल बार्शीटाकळी येथील अमली पदार्थ (ड्रग्ज) तयार करणाऱ्या फॅक्टरीमध्ये पाठविले असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे फरार आरोपी मोहम्मद अशरफ मोहम्मद आझम राइन वय 26 वर्ष राहणार तामिरे मिल्लत मस्जिद जवळ बैंगनवाडी मुंबई याला भोपाळ येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आले आहे.
सदर आरोपीला आज रोजी अटक करून मा. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी साहेब कोर्ट बार्शीटाकळी यांच्याकडे पोलिस कस्टडी रिमांड करिता हजर केले असता त्याचा दिनांक 28/12/2025 रोजी पावतो पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आला. नमूद आरोपी कडे तपास करून गुन्ह्यातील ड्रग्स तयार करण्यात आलेल्या साखळी संबंधाने तपास करून पुरावे गोळा करण्यात येत आहे.सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधिक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, शंकर शेळके पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांचे मार्गदर्शनाखाली API विजय चव्हाण, PSI गोपाल जाधव, माजीद पठाण, HC खुशाल नेमाडे, PCधीरज वानखडे, राज चंदेल, राहुल गायकवाड, चालक PC देवानंद खरात यांनी कार्यवाही केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे