अकोला : सावरखेड टोल नाक्यावर वाहनधारकाला मारहाण
अकोला, 25 डिसेंबर (हिं.स.)। अकोला–वाशिम महामार्गावरील अकोला आणि वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सावरखेड टोल नाक्यावर धक्कादायक प्रकार घडला आहे. मालेगाव येथून अकोल्याकडे येणाऱ्या एका वाहनधारकास शिल्लक पैशांच्या कारणावरून टोल नाक्यावरील कर्मचाऱ्य
Photo


अकोला, 25 डिसेंबर (हिं.स.)। अकोला–वाशिम महामार्गावरील अकोला आणि वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सावरखेड टोल नाक्यावर धक्कादायक प्रकार घडला आहे. मालेगाव येथून अकोल्याकडे येणाऱ्या एका वाहनधारकास शिल्लक पैशांच्या कारणावरून टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी लाटाकाठ्याने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव हे गाव टोल नाक्याच्या अगदी जवळ असल्यामुळे मालेगाव ते अकोला प्रवासासाठी टोल आकारणीवरून वारंवार वाद होत असल्याचे सांगितले जाते,याच वादातून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे.या सावरखेड टोल नाक्यावर यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्याचे समोर आले असून, येथे शासनाच्या नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचा आरोप वाहनधारकांकडून करण्यात येत आहे. कोणतेही ठोस नियम न पाळता कंत्राटदार मनमानी कारभार करत असल्याचेही वाहनधारकांचे म्हणणे आहे.दरम्यान, या घटनेची दखल घेत पोलीस अधिक तपास करत असून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande