कर्नाटकात बस-ट्रकच्या भीषण अपघातात, १० जणांचा मृत्यू
बंगळुरू, 25 डिसेंबर (हिं.स.)।कर्नाटकमध्ये गुरुवारी एका भीषण रस्ता अपघात घडला आहे. चित्रदुर्ग जिल्ह्यात एका ट्रकशी धडक झाल्यानंतर खासगी स्लीपर कोच बसला आग लागली.या आगीत जळून १० हुन अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. ही स्लीपर बस बंगळुरूहून शिवमोग्गाकडे जा
कर्नाटकात बस-ट्रकची धडक होऊन भीषण अपघात


बंगळुरू, 25 डिसेंबर (हिं.स.)।कर्नाटकमध्ये गुरुवारी एका भीषण रस्ता अपघात घडला आहे. चित्रदुर्ग जिल्ह्यात एका ट्रकशी धडक झाल्यानंतर खासगी स्लीपर कोच बसला आग लागली.या आगीत जळून १० हुन अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. ही स्लीपर बस बंगळुरूहून शिवमोग्गाकडे जात असताना राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली.

पोलिसांनी सांगितले पोलिसांच्या माहितीनुसार, हा अपघात बुधवार आणि गुरुवारच्या मध्यरात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास झाला. एक खासगी स्लीपर बस बंगळुरूहून गोकार्णाकडे जात असताना, समोरून येणाऱ्या ट्रकने तिला जोरदार धडक दिली. धडकेनंतर बस आणि ट्रकला आग लागली. या अपघातात ट्रकचा काही भाग जळून खाक झाला असून ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. बसमध्ये चालक आणि वाहकासह एकूण ३२ प्रवासी होते.

आग वेगाने पसरल्यामुळे अनेक प्रवासी बसमध्येच अडकून पडले आणि त्यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही, परिणामी त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचेही पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या दुर्घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच डीएसपी शिवकुमार घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचाव व मदत कार्यावर देखरेख केली. स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचे समोर आले आहे. ट्रकच्या जोरदार धडकेमुळे बसला तात्काळ आग लागली आणि बस पूर्णपणे जळून खाक झाली. त्यामुळे बचावकार्य करताना पोलिसांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. हिरियूर ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघाताची कारणे शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. ट्रक चालक वाहन चालवताना झोपेत गेला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, कर्नाटकातील या अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. एक्सवरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे, “कर्नाटकच्या चित्रदुर्ग जिल्ह्यात झालेल्या अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे मला अतिशय दुःख झाले आहे. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (पीएमएनआरएफ) २ लाख रुपयांची मदत दिली जाईल, तर जखमींना ५० हजार रुपये दिले जातील.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande