राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून वाजपेयींना आदरांजली
नवी दिल्ली, 25 डिसेंबर (हिं.स.)। माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 101 व्या जयंती निमित्ता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्र
वाजपेयी यांच्या समाधीस्थळी पुष्पांजली अर्पण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी


नवी दिल्ली, 25 डिसेंबर (हिं.स.)। माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 101 व्या जयंती निमित्ता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्लीतील ‘सदैव अटल’ या स्मारकाला भेट देऊन आदरांजली अर्पण केली.

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्लीत उभारण्यात आलेल्या ‘सदैव अटल’ स्मारकातही विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या योगदानाची आठवण करून देत आपल्या ‘एक्स’ हँडलवर व्हिडीओ शेअर केला होता. वाजपेयी यांचे आचरण, विचार आणि अढळ संकल्प हे राजकारणासाठी आदर्श मापदंड असल्याचे त्यांनी सांगितले. संस्कृत श्लोकाचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, वाजपेयी यांची जयंती ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून प्रेरणा घेण्याची विशेष संधी आहे. वाजपेयी यांनी नेहमीच राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले, असेही पंतप्रधानांनी अधोरेखित केले. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी ‘सदैव अटल’ स्मारकावर श्रद्धासुमने अर्पण केली. पंतप्रधान मोदी यांनी व्हिडीओ संदेश जारी करण्यासोबतच ‘सदैव अटल’ स्मारकाला भेट देऊनही वाजपेयी यांना आदरांजली वाहिली.अटल बिहारी वाजपेयी यांच्या ‘सदैव अटल’ स्मारकावर आयोजित संगीतबद्ध श्रद्धांजली कार्यक्रमात पंतप्रधान मोदींसह माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, भाजपचे नवनियुक्त कार्यकारी अध्यक्ष नितीन नवीन, केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा तसेच अनेक धर्मगुरू उपस्थित होते.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande