ब्रीज राष्ट्रीय स्पर्धेला मोठ्या उत्सहात सुरुवात
नाशिक, 27 डिसेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र ब्रीज असोसिएशन, नाशिक जिल्हा ब्रीज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे ज्यूनियर गटाच्या राष्ट्रीय ब्रीज स्पर्धा आणि निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला आज मोठ्या उत्साहात सुरवात झाली. आज
ब्रीज राष्ट्रीय स्पर्धेला मोठ्या उत्सहात


ब्रीज राष्ट्रीय स्पर्धेला मोठ्या उत्सहात सुरवात.


नाशिक, 27 डिसेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र ब्रीज असोसिएशन, नाशिक जिल्हा ब्रीज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे ज्यूनियर गटाच्या राष्ट्रीय ब्रीज स्पर्धा आणि निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला आज मोठ्या उत्साहात सुरवात झाली. आजपासून तीन दिवस सुरु असणाऱ्या या स्पर्धेचे उदघाटन केद्रीय वस्तू आणि सेवा कर तथा उत्पाद आणि सीमा शुल्क विभागाचे सहआयुक्त जगदीश डोडी (डी. जगदीश) यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी नाशिकचे क्रीडा संघटक तथा व्यावसायिक चंद्रशेखर सिंग, ब्रीज फेडेरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष तथा या ज्युनियर गटाच्या उपक्रमाचे प्रमुख आनंद सामंत, ब्रीजचे विश्व स्पर्धा पदक विजेते तथा प्रशिक्षक अनिल पाध्ये, या स्पर्धेचे आयोजन प्रमुख तथा महाराष्ट्र ब्रीज असोसिएशनचे सचिव हेमंत पांडे, नाशिक जिल्हा ब्रीज असोसिएशनचे सचिव डॉ. अतुल दशपुत्रे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलतांना सहआयुक्त डी. जगदीश यांनी सांगितले की, ब्रीज हा आपल्या मेंदूला चालना देणारा खेळ आहे. बिल गेट्स सारखे मोठे उद्योजकापासून ते अनेक उच्च शिक्षण घेणारे या खेळाशी जोडलेले आहेत.या खेळामुळे खेळडूंना खेळाबरोबरच आपल्या दैनंदिन आयुष्यात याचा फार चांगला फायदा होतो असे सांगून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. आनंद सामंत यांनी या स्पर्धेचा उद्देश सांगितला. यावेळी चंद्रशेखर सिंग यांनीही खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्पर्धा प्रमुख हेमंत पांडे यांनी केले.

या स्पर्धेत १६ वर्षे, २१ वर्षे, २६ वर्षे आणि ३१ वर्षे असे वयोगट आहेत. या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारतातील विविध राज्यातून १३० खेळाडू सहभागी झाले आहेत.

या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे विविध गटामध्ये खेळाडूंची संभाव्य प्राथमिक निवड करण्यात येणार आहे. या निवड झालेल्या खेळाडूंचे प्रशिक्षण तज्ञ मार्गदर्शकांच्या मार्फत पुढील सहा महिने प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येणार आहे. आणि त्यानंतर खेळाडूंची भारतीय संघामध्ये अंतिम निवड करण्यात येणार आहे. हे निवड झालेले खेळाडू ऑगस्ट, २०२६ मध्ये चीन येथे आयोजित जागतिक ब्रिज स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करतील अशी माहिती आनंद सामंत आणि हेमंत पांडे यांनी दिली. या निवड चाचणी प्रक्रियेत आनंद सामंत आणि अनिल पाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ञ प्रशिक्षक संदीप ठाकराल, कौस्तुभ बेंद्रे आणि सहकारी कार्यरत असणार आहेत. या स्पर्धेची तांत्रिक बाजू तांत्रिक प्रमुख विश्वनाथ बेडिया आणि चेतन रावल हे सांभाळत आहेत.

तीन दिवस सुरु असणाऱ्या या स्पर्धेच्या आजच्या पहिल्या दिवशी विविध गटांच्या आय. एम. पी. पेयर्स या प्रकारचे सामने खेळविले जात आहेत. उद्या दिनांक २८ रोजी मॅच पाईंट पेयर्स स्पर्धा होतील तर दिनांक २९ रोजी टीम इव्हेंट (सांघिक) प्रकारच्या स्पर्धा होतील अशी माहिती विश्वनाथ बेडिया आणि चेतन रावल यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande