रत्नागिरी : चिपळूणच्या करसल्लागार निशा आंबेकर यांना सहा प्रकारात 'सुवर्ण पदक'
रत्नागिरी, 27 डिसेंबर, (हिं. स.) : महाराष्ट्र मास्टर्स ॲथलेटिक असोसिएशनतर्फे पुणे येथे राज्यस्तरीय ॲथलेटिक्स, स्विमिंग, पॉवरलिफ्टिंग, वेटलिफ्टिंग, व्हॉलिबॉल, कबड्डी, बॅडमिंटन, टेबलटेनिस आदी स्पर्धा घेण्यात आल्या. चिपळूणच्या करसल्लागार निशा आंबेकर य
रत्नागिरी : चिपळूणच्या करसल्लागार निशा आंबेकर यांना सहा प्रकारात 'सुवर्ण पदक'


रत्नागिरी, 27 डिसेंबर, (हिं. स.) : महाराष्ट्र मास्टर्स ॲथलेटिक असोसिएशनतर्फे पुणे येथे राज्यस्तरीय ॲथलेटिक्स, स्विमिंग, पॉवरलिफ्टिंग, वेटलिफ्टिंग, व्हॉलिबॉल, कबड्डी, बॅडमिंटन, टेबलटेनिस आदी स्पर्धा घेण्यात आल्या. चिपळूणच्या करसल्लागार निशा आंबेकर यांनी ४५ वरील वयोगटात सुवर्णपदकांची लयलूट केली.

निशा आंबेकर यांनी गोळाफेक, थाळीफेक, हॅमर थ्रो, १०० मी. फ्री स्टाईल, २०० मी. फ्री स्टाइल आणि पॉवरलिफ्टिंग या सहा प्रकारांत सुवर्णपदक पटकावले. ५० मी. फ्री स्टाइलमध्ये रौप्यपदक मिळवले. त्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

व्यवसायाने करसल्लागार असलेल्या आंबेकर यांना बीकॉम, एमबीए, जीडीसी अ‍ॅण्ड ए चे शिक्षण घेताना शाळा-कॉलेज जीवनापासून खेळाची आवड होती. गेल्या वर्षी शिर्डी येथे झालेल्या राज्यस्तरीय खेलो मास्टर्सअंतर्गत विविध क्रीडाप्रकारात आठ सुवर्णपदकांची लयलूट केली होती. या कामगिरीच्या जोरावर त्यांचा विविध संस्थांनी पुरस्कार देत गौरव केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande