नांदेड - ने.सु.बो. महाविद्यालयाच्या कु. रंजना यादवची राजपथावरील पथकासाठी निवड
नांदेड, 28 डिसेंबर (हिं.स.)। नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाची एन.सी.सी कॅडेट तथा ज्युनियर अंडर ऑफिसर कु. रंजना यादव हिची प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथील ऐतिहासिक कर्तव्यपथावर (राजपथ) आयोजित होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील रिपब्लिक डे कॅम
नांदेड - ने.सु.बो. महाविद्यालयाच्या कु. रंजना यादवची राजपथावरील पथकासाठी निवड


नांदेड, 28 डिसेंबर (हिं.स.)।

नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाची एन.सी.सी कॅडेट तथा ज्युनियर अंडर ऑफिसर कु. रंजना यादव हिची प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथील ऐतिहासिक कर्तव्यपथावर (राजपथ) आयोजित होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील रिपब्लिक डे कॅम्प (आरडीसी) परेडसाठी एन.सी.सी महाराष्ट्र डायरेक्टरेटच्या पथसंचलन पथकात निवड झाली आहे. ही परेड भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.

देशभरातील निवडक व उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट्सना हा मानाचा सन्मान लाभतो. कु. रंजना यादवची निवड ही नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयासाठी, नांदेड जिल्ह्यासाठी व संपूर्ण मराठवाड्यासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरणारी ऐतिहासिक कामगिरी आहे. राजपथावरील या

प्रतिष्ठित परेडपूर्वी कु. रंजनाने लातूर, छत्रपती संभाजीनगर व पुणे येथे आयोजित विविध पूर्व-शिबिरांमध्ये सक्रिय सहभाग घेत आपल्या शिस्तबद्ध व कौशल्यपूर्ण सादरीकरणातून उत्कृष्ट कामगिरी बजावली. या सर्व टप्प्यांमध्ये तिने आपली शारीरिक क्षमता, नेतृत्वगुण, शिस्त व देशभक्तीची जाणीव प्रभावीपणे सिद्ध केली. कु. रंजना यादव ही सौ. बदामीदेवी रमेश यादव रा. नांदेड यांची कन्या असून तिचे शालेय शिक्षण माधवराव वटेमोड विद्यालय, कौठा नांदेड येथे झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande