इराणने अणु कार्यक्रम पुन्हा सुरू केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल- ट्रम्प
वॉशिंग्टन, 30 डिसेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे फ्लोरिडामधील आपल्या निवासस्थानी स्वागत करताना इराणला त्याचा अणु कार्यक्रम पुन्हा सुरू करू नये, असा कठोर इशारा दिला आहे. माध्यम
इराणने अणु कार्यक्रम पुन्हा सुरू केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल- ट्रम्प


वॉशिंग्टन, 30 डिसेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे फ्लोरिडामधील आपल्या निवासस्थानी स्वागत करताना इराणला त्याचा अणु कार्यक्रम पुन्हा सुरू करू नये, असा कठोर इशारा दिला आहे. माध्यमांशी बोलताना ट्रम्प यांनी ठाम शब्दांत सांगितले की, इराणने अणु कार्यक्रम पुन्हा सुरू केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल.

हा इशारा ट्रम्प यांच्या त्या विधानानंतर आला आहे, ज्यात त्यांनी जून महिन्यात अमेरिकेने इराणमधील प्रमुख अणु संवर्धन केंद्रांवर केलेल्या हल्ल्यांमुळे तेहरानची अणु क्षमता पूर्णपणे नष्ट झाल्याचा दावा केला होता. मात्र, स्थानिक माध्यमांमध्ये इस्रायली अधिकाऱ्यांच्या हवाल्याने अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे की, इराण इस्रायलवर हल्ला करण्यास सक्षम असलेल्या दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा साठा पुन्हा उभारण्याचा प्रयत्न करत आहे, जो इस्रायलसाठी गंभीर धोका ठरू शकतो.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कठोर शब्दांत इशारा देत सांगितले की, जर इराणने आपली अणु आणि लष्करी क्षमता पुन्हा उभारण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला, तर अमेरिका त्याच्यावर हल्ला करण्यास तयार राहील. ही आतापर्यंतची ट्रम्प यांची सर्वात कडक धमकी मानली जात आहे.

नेतन्याहू यांचे स्वागत करताना पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, “आता मला कळत आहे की इराण पुन्हा आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. जर ते तसे करत असतील, तर आपल्याला त्यांना रोखावेच लागेल. आम्ही त्यांना पराभूत करू. आम्ही त्यांना निर्णायकरीत्या हरवू. मात्र, अशी वेळ येऊ नये, अशीच अपेक्षा आहे.”

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढे म्हणाले,“मी असे म्हणू इच्छित नाही, पण कदाचित इराणचे वर्तन अयोग्य असू शकते. याची अद्याप खात्री झालेली नाही. पण तसे असल्यास, त्याचे परिणाम त्यांना माहीत आहेत. ते परिणाम अत्यंत गंभीर असतील—कदाचित मागील वेळेपेक्षाही अधिक. इराणने याआधीच करार करून घ्यायला हवा होता. मी त्यांना एक संधी दिली होती.”जेव्हा ट्रम्प यांना विचारण्यात आले की ते इस्रायलच्या हल्ल्याला पाठिंबा देतील का, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितले की इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाविरोधात कारवाई करण्यास ते पाठिंबा देतील, आणि जर तेहरानने अणु हालचाली पुढे नेल्या, तर त्वरित कारवाई केली जाईल.

या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेने इराणमधील तीन अणु प्रकल्पांवर बॉम्बहल्ले केले होते. इराण आधीच अनेक वर्षांच्या निर्बंधांमुळे आणि प्रादेशिक संघर्षांमुळे अडचणीत आहे. मात्र, इराणने असा दावा केला आहे की तो सध्या देशात कुठेही युरेनियम संवर्धन करत नाही, तसेच पाश्चिमात्य देशांशी चर्चेसाठी तो तयार आहे.दरम्यान, ट्रम्प यांनी इराणवर टीका करत म्हटले की, अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांपूर्वी इराणने आपला अणु कार्यक्रम पूर्णपणे बंद करण्याचा करार केला नव्हता. आता त्यांना तो करार न केल्याची खंत वाटत असणार, असेही ट्रम्प म्हणाले.

नेतन्याहू यांचा हा दौरा अशा वेळी झाला आहे, जेव्हा गाझामधील इस्रायल–हमास युद्धविरामाचे भवितव्य अनिश्चित आहे. ट्रम्प यांनी सांगितले की युद्धविरामाचा दुसरा टप्पा “जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर” पुढे नेण्याची त्यांची इच्छा आहे, मात्र त्यासाठी हमासचे निशस्त्रीकरण आवश्यक आहे.ते म्हणाले, “आपल्याला दुसऱ्या टप्प्यात जायचे आहे, पण हमासने शस्त्रे खाली ठेवली पाहिजेत.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande