
मुंबई, 30 डिसेंबर (हिं.स.)। भारतातील अग्रगण्य नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी-मायक्रो फायनान्स संस्था (NBFC-MFI) असलेल्या मुथूट मायक्रोफिन लिमिटेडने (NSE: MUTHOOTMF, BSE: 544055) एक महत्त्वपूर्ण व्यावसायिक टप्पा गाठल्याची घोषणा केली. कंपनीच्या वैयक्तिक कर्ज पोर्टफोलिओची व्यवस्थापनाधीन मालमत्ता (AUM) 1,000 कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे, तर कंपनीची एकूण व्यवस्थापनाधीन मालमत्ता (AUM) 13,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे.
हा टप्पा म्हणजे मुथूट मायक्रोफिनच्या वैविध्यपूर्ण कर्ज पोर्टफोलिओला बळकट करण्याच्या स्थिर प्रगतीचे प्रतिबिंब आहे, तर मायक्रोफायनान्स हा कंपनीच्या व्यवसायाचा पाया आहे. शिस्तबद्ध कर्जमंजुरी प्रक्रिया, मुळापासून लक्ष केंद्रित करून केलेली अंमलबजावणी आणि पोर्टफोलिओच्या गुणवत्तेवर सतत दिलेल्या भर यामुळे वैयक्तिक कर्ज पोर्टफोलिओमधील वाढ भक्कम झाली आहे. या सगळ्याचा मुख्य मायक्रोफायनान्सला फायदा होतो.
कर्ज वितरणाच्या सुधारत असलेल्या वेग, ग्राहकांचा मजबूत सहभाग आणि सातत्यपूर्ण वसुलीच्या क्षमतेमुळे मुथूट मायक्रोफिनने आपले स्थान अधिकाधिक भक्कम केले आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत, 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 392 जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या 1,718 शाखांच्या नेटवर्कद्वारे कंपनीचे 33.6 लाख सक्रिय ग्राहक आहेत. यातही प्रामुख्याने ग्रामीण आणि निम-शहरी बाजारपेठांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाते.
या महत्त्वाच्या टप्प्यावर भाष्य करताना, मुथूट मायक्रोफिनचे अध्यक्ष आणि गैर-कार्यकारी संचालक श्री. थॉमस मुथूट म्हणाले, “हे यश आमच्या प्रवासात अत्यंत महत्त्वाचे आहे. मायक्रोफायनान्स हा आमच्या व्यवसायाचा पाया असला तरी, वैयक्तिक कर्जपुरवठ्यामध्ये आमचा नियोजित विस्तार हा अधिक लवचिक आणि संतुलित पोर्टफोलिओ देण्याच्या उद्देशाने आहे. आमचे हे यश जबाबदार वाढ, मजबूत प्रशासन आणि आमच्या ग्राहक तसेच भागधारकांना शाश्वत मूल्य प्रदान करण्याच्या आमच्या दीर्घकालीन वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे.”
मुथूट मायक्रोफिनचे मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. सदाफ सईद म्हणाले, “वैयक्तिक कर्ज पोर्टफोलिओमधील सातत्यपूर्ण वाढ ही केंद्रित अंमलबजावणी आणि शिस्तबद्ध जोखीम व्यवस्थापनाचा परिणाम आहे. शिस्तबद्ध कर्ज मूल्यांकन आणि मजबूत वसुली प्रक्रियेद्वारे हा पोर्टफोलिओ तयार करण्यात आला आहे. ज्यामुळे वाढ होत असतानाही त्याच्या कामगिरीत काहीही फरक पडत नाही, ती उत्तमच होते. व्यवसायातील सुधारलेली गती आणि बळकट कार्यप्रणालीमुळे, आर्थिक समावेशनाला पाठिंबा देत असतानाच, गुणवत्ता-आधारित वाढ कायम ठेवण्याचा आम्हाला विश्वास आहे.”
परवडणाऱ्या आणि जबाबदार कर्जाद्वारे मुथूट मायक्रोफिन महिला उद्योजकांना सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. त्याचबरोबर दीर्घकालीन वाढीस पाठिंबा देण्यासाठी निवडकपणे संलग्न कर्ज क्षेत्रांमध्ये विस्तार करत आहे. ग्राहकांचा अनुभव आणि पोर्टफोलिओची लवचिकता वाढवण्यासाठी आपल्या जोखीम व्यवस्थापन प्रणाली, कार्यात्मक कार्यक्षमता आणि डिजिटल क्षमता मजबूत करण्यासाठी कंपनी गुंतवणूक करते आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर