मुंबईचा आशिष ठाकूर २०२५च्या ११व्या यंगमोडो नॅशनल चॅम्पियनशिपचा विजेता
मुंबई, 31 डिसेंबर (हिं.स.) विरार येथील ग्रिन पॅरडाईज रिसॉर्ट येथे आयोजित ११व्या यंगमोडो नॅशनल टुर्नामेंट मध्ये महाराष्ट्रातून मुंबईचा मैत्री स्पोर्ट्स अकॅडमीचा खेळाडू आशिष ठाकूर याने क्योरूगी आणि पूमसे या क्रीडाप्रकारात प्रत्येकी एक गोल्ड मेडल असे
आशिष ठाकूर २०२५च्या ११व्या यंगमोडो नॅशनल चॅम्पियनशिपचा विजेता


मुंबई, 31 डिसेंबर (हिं.स.)

विरार येथील ग्रिन पॅरडाईज रिसॉर्ट येथे आयोजित ११व्या यंगमोडो नॅशनल टुर्नामेंट मध्ये महाराष्ट्रातून मुंबईचा मैत्री स्पोर्ट्स अकॅडमीचा खेळाडू आशिष ठाकूर याने क्योरूगी आणि पूमसे या क्रीडाप्रकारात प्रत्येकी एक गोल्ड मेडल असे एकूण दोन गोल्ड मेडल मिळवण्यात यशस्वी झाला असून ११व्या यंगमोडो नॅशनल चॅम्पियनशिपचे गोल्ड मेडल मिळवण्यात यशस्वी झाला आहे. या स्पर्धेसाठी भारतातील विविध राज्यांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

आशिष ठाकूरच्या या अतुलनीय यशामुळेच साऊथ कोरिया येथे खेळल्या जाणाऱ्या इंटर नॅशनल यंगमोडो टुर्नामेंटसाठी त्याची निवड झाली आहे.

मुंबईचा आशिष ठाकूर या अतिशय गुणी, मेहनती, गरीब मध्यमवर्गीय विद्यार्थी खेळाडूच्या यंगमोडो क्रीडाप्रकारातील या उत्तूंग यशाबद्दल विविध सामाजिक स्तरावर त्याचे खास कौतुक होत आहे. तो विकास नाईट ज्युनिअर कॉलेज, विक्रोळी येथिल माजी विद्यार्थी असून कॉलेजचे प्राध्यापक, विद्यार्थी मित्रांतर्फे आशिष ठाकूरला भविष्यातील यशासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande