अमेरिकेनंतर चीनचा भारत- पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी करण्यात मध्यस्थी केल्याचा दावा
बीजिंग , 31 डिसेंबर (हिं.स.)।अमेरिकेनंतर आता चीनने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी करण्यात मध्यस्थी केल्याचा दावा केला आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी मंगळवारी सांगितले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव हा या वर्षी चीनने मध्यस
भारत- पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी करण्यात मध्यस्थी केल्याचा चीनचा दावा


बीजिंग , 31 डिसेंबर (हिं.स.)।अमेरिकेनंतर आता चीनने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी करण्यात मध्यस्थी केल्याचा दावा केला आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी मंगळवारी सांगितले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव हा या वर्षी चीनने मध्यस्थी केलेल्या प्रमुख मुद्द्यांच्या यादीत समाविष्ट आहे.

चिनी परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी बीजिंगमध्ये आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि चीनचे परराष्ट्र संबंध यांवर आयोजित एका कार्यक्रमात भाषण केले. वांग यी म्हणाले, “द्वितीय महायुद्ध समाप्त झाल्यानंतर या वर्षी स्थानिक युद्धे आणि सीमापार संघर्ष अधिक वारंवार भडकले आहेत.”

ते पुढे म्हणाले, “शाश्वत शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही एक वस्तुनिष्ठ आणि न्याय्य भूमिका घेतली आहे. उत्तर म्यानमार, इराणचा अणु प्रश्न, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव, पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांच्यातील मुद्दे तसेच अलीकडील कंबोडिया आणि थायलंड यांच्यातील संघर्ष या सर्व प्रकरणांमध्ये आम्ही मध्यस्थी केली आहे.” भारत आणि पाकिस्तान यांच्यात 7 ते 10 मे या कालावधीत संघर्ष झाला होता. तर 10 मे रोजी दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी (संघर्षविराम) झाली. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी घडवून आणल्याचा दावा अनेक वेळा केला आहे. मात्र, भारताने स्पष्ट केले आहे की, ही शस्त्रसंधी दोन्ही देशांच्या सैन्यांच्या डीजीएमओ (डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स) यांच्यातील चर्चेनंतर झाली होती. भारताचे ठाम मत आहे की, भारत–पाकिस्तान संबंधांशी संबंधित प्रकरणांमध्ये कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande