बीडमध्ये क्रीडा महोत्सवात रंगल्या मुलांच्या कबड्डी स्पर्धा
बीड, 31 डिसेंबर (हिं.स.)जयभवानी आणि जगदंबा शिक्षण संस्थेअंतर्गत शारदा क्रीडा महोत्सवात मुलांच्या १७ व १४ क्योगटातील कबड्डी स्पर्धेत १८ संघांनी सहभाग नोंदवला. ४ जानेवारीपर्यंत हा महोत्सव चालणार असून यात १८०० विद्यार्थी सहभागी झाले. जयभवानी आणि जगद
बीड


बीड


बीड, 31 डिसेंबर (हिं.स.)जयभवानी आणि जगदंबा शिक्षण संस्थेअंतर्गत शारदा क्रीडा महोत्सवात मुलांच्या १७ व १४ क्योगटातील कबड्डी स्पर्धेत १८ संघांनी सहभाग नोंदवला. ४ जानेवारीपर्यंत हा महोत्सव चालणार असून यात १८०० विद्यार्थी सहभागी झाले.

जयभवानी आणि जगदंबा शिक्षण संस्थेअंतर्गत शारदा क्रीडा महोत्सवात प्राथमिक व माध्यमिक १७व १४ वयोगटातील मुलांच्या कबड्डी स्पर्धा घेण्यात आल्या.

शारदा क्रीडा महोत्सवात मुलींच्या कबड्डी स्पर्धेत जयभवानी विद्यालय गढीच्या संघाने विजेतेपद पटकावले. माध्यमिक विद्यालय घोगस पारगावचा संघ उपविजेता ठरला. शिवाजी विद्यालय मालेगावचा संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला. अंतिम सामन्यात जयभवानी विद्यालयाच्या संघाने उत्कृष्ट खेळ करत विजय मिळवला. संघाच्या कप्तान ज्ञानेश्वरी शिंदेच्या नेतृत्वाखाली श्रुती गोकुळ, निशा राठोड, संध्या पवार, शिवानी बोर्डे, प्राची जाधव, निकिता चव्हाण, सुप्रिया केकान, गौरी कांडेकर, सिद्धी धोत्रे, सखू कादे, गीता वायभट यांनी चांगली कामगिरी केली.

रणवीर पंडित हे गेल्या ३ वर्षांपासून सातत्य राखून हा क्रीडा महोत्सव घेत असल्याने गेवराई तालुक्यात खूप मोठी क्रीडा चळवळ सुरू आहे. लाल मातीवर आयुष्य आणि भविष्य घडवण्याची चांगली संधी रणवीर पंडित यांनी उपलब्ध करून दिली. तुम्ही जेव्हा खेळतात त्यासाठी हजारो हात मेहनत घेत आहेत. याच याच मातीतून चांगले खेळाडू तयार होतील. विद्यार्थी मित्रांनो लढत राहा, खेळत राहा आणि आयुष्याच्या वळणावर जाऊन यशस्वी व्हा असे पत्रकार व्यंकटेश वैष्णव म्हणाले.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande