
ठाणे, 31 डिसेंबर (हिं.स.)।
राज्याच्या विकासाची 'ब्लु प्रिंट' सर्वप्रथम साकारणाऱ्या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या खेपेला ठाण्यात चमत्कार घडवण्याचा चंग बांधला आहे. ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीला कडवी टक्कर देण्यासाठी मनसेने २८ सुशिक्षित मराठी उमेदवार मैदानात उतरवले आहेत. ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली या २८ शिलेदारांनी आपापले उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल केले.
ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणुक येत्या १५ जानेवारी रोजी होत असुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्या आघाडीचा सामना प्रस्थापितांसोबत होत आहे. तब्बल २० वर्षानी दोन्ही ठाकरे बंधु एकत्र आल्याने ठाण्यातही 'ठाकरे' ब्रॅण्डचा बोलबाला सुरू आहे. मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मनसेच्या २८ उमेदवारांनी जल्लोषी वातावरणात आपले अर्ज दाखल केले. *'म'* मराठीचा तसेच *'म'* महाराष्ट्राचा ह्याला अभिप्रेत मानुन मनसेने यावेळी जवळपास सर्व मराठी उमेदवारांनाच निवडणुकीत संधी उपलब्ध करून दिली आहे. मनसेचे हे मराठी शिलेदार मध्यमवर्गीय कुटुंबातील असुन महायुतीला कडवी टक्कर देण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे ठाण्यात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा लढा रंगणार आहे.
*मनसेच्या अधिकृत उमेदवारांची यादी*
प्रभाग क्र. ३ (क) श्री. निलेश चव्हाण
प्रभाग क्र . २ (ड) श्री. रविंद्र मोरे
प्रभाग क्र. ४ (अ) - प्रतिक्षा हरेश्वर डाकी
प्रभाग क्र. ५ (ड) श्री. पुष्कराज विचारे
प्रभाग क्र. २० (ब) सौ. सविता चव्हाण
प्रभाग क्र. २० (क) सौ. राजश्री नाईक
प्रभाग क्र. १४ (अ) सौ. रेश्मा चौधरी
प्रभाग क्र. १९ (ब) सौ. प्रमिला मोरे
प्रभाग क्र. १६ (ब) सौ. आरती पाटील
प्रभाग क्र. ८ (ड) श्री. सचिन कुरेल
प्रभाग क्र. १५ (अ)श्री. पवनकुमार पडवळ
प्रभाग क्र. १६ (क) सौ. रश्मी सावंत
प्रभाग क्र. ७ (ब) सौ. स्वप्नाली खामकर - पाचंगे
प्रभाग क्र. २१ (ब) सौ. संजीता जोशी
प्रभाग क्र. २१ (क) सौ. उर्मिला डोंगरे
प्रभाग क्र. ११ (क) सौ. सीमा इंगळे
प्रभाग क्र. १७ (ब) सौ. पूजा ढमाळ
प्रभाग क्र. १२ (ब ) सौ. रक्षा मांडवकर
प्रभाग क्र १२ (अ) श्री. रूपेश जाधव
प्रभाग क्र. १८ (क) सौ. प्राची घाडगे
प्रभाग क्र. २२ (ब) श्री. रविंद्र सोनार
प्रभाग क्र. २२ (अ) सौ. प्रज्ञा कांबळे
प्रभाग क्रमांक - २७
अ - प्रकाश दत्ता पाटील
ब - नीता देवेंद्र भगत
क - मयूरी तेजस पोरजी
ड - प्रशांत प्रभाकर गावड़े
प्रभाग क्रमांक - २८
ब - रेश्मा नरेश पवार
क - अंकिता अनंत कदम
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर