भारताने काही स्टील उत्पादनांवर लादले आयात शुल्क, चीनमधून स्वस्त आयात रोखण्याचे उद्दिष्ट
नवी दिल्ली, 31 डिसेंबर (हिं.स.)भारताने काही स्टील उत्पादनांवर तीन वर्षांसाठी आयात शुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, भारताने काही स्टील उत्पादनांवर तीन वर्षांसाठी ११-१२ टक्के कर लादण्याचा निर्णय घ
भारताने काही स्टील उत्पादनांवर लादले आयात शुल्क


नवी दिल्ली, 31 डिसेंबर (हिं.स.)भारताने काही स्टील उत्पादनांवर तीन वर्षांसाठी आयात शुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, भारताने काही स्टील उत्पादनांवर तीन वर्षांसाठी ११-१२ टक्के कर लादण्याचा निर्णय घेतला आहे. चीनमधून होणाऱ्या स्वस्त स्टील आयातीवर अंकुश लावण्याचा प्रयत्न म्हणून या हालचालीकडे पाहिले जात आहे. पहिल्या वर्षी स्टील आयातीवर १२ टक्के कर लादला जाईल, दुसऱ्या वर्षी तो ११.५ टक्के केला जाईल आणि तिसऱ्या वर्षी तो आणखी कमी करून ११ टक्के केला जाईल.

अलिकडेच भारतात स्वस्त चिनी स्टीलची आयात वाढली आहे. याला चीनकडून होणारे डंपिंग म्हणून पाहिले जात आहे. यामुळे भारतीय स्टील उत्पादकांवर दबाव वाढला आहे. भारतात स्टीलच्या किमतींमध्ये अलिकडेच झालेल्या अचानक, तीक्ष्ण आणि लक्षणीय वाढीमुळे देशांतर्गत उद्योग उत्पादकांचे गंभीर नुकसान झाले आहे आणि भविष्यातही नुकसान होण्याची शक्यता आहे. या कारणास्तव भारतात संबंधित वस्तूंच्या आयातीवर तात्पुरते सेफगार्ड ड्युटी लादणे आवश्यक झाले आहे.या निर्णयामुळे काही विकसनशील देशांमधून होणाऱ्या आयातीतून सूट मिळेल. पण चीन, व्हिएतनाम आणि नेपाळमधील वस्तूंवर कर आकारला जाणार आहे. या करमध्ये स्टेनलेस स्टीलसह काही स्टील वस्तूंचा समावेश नसेल. एप्रिलच्या सुरुवातीला सरकारने २०० दिवसांच्या कालावधीसाठी १२ टक्के अंतरिम सुरक्षा शुल्क लादले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande