विजय हजारे ट्रॉफी : सरफराज खानचे 56 चेंडूत झंझावती शतक
जयपूर, 31 डिसेंबर (हिं.स.) विजय हजारे ट्रॉफीमध्ये सरफराज खानने शानदार कामगिरी केली. त्याने मुंबईसाठी ५६ चेंडूत शतक ठोकले. त्याने गोव्याविरुद्ध ही कामगिरी केली. सध्या भारतीय संघाबाहेर असलेल्या सरफराजच्या शतकाने निवडकर्त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. स
सरफराज खान


जयपूर, 31 डिसेंबर (हिं.स.) विजय हजारे ट्रॉफीमध्ये सरफराज खानने शानदार कामगिरी केली. त्याने मुंबईसाठी ५६ चेंडूत शतक ठोकले. त्याने गोव्याविरुद्ध ही कामगिरी केली. सध्या भारतीय संघाबाहेर असलेल्या सरफराजच्या शतकाने निवडकर्त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. सरफराजने आपल्या शानदार शतकी खेळीमध्ये आठ षटकार आणि सहा चौकार मारले. फंलदाजीसाठी तो मैदानात उतरल्यापासून ते शेवटपर्यंत त्याने गोव्याच्या गोलंदाजांना सामन्यात परतण्याची कोणतीही संधी दिली नाही.

मुंबईचा सलामीवीर यशस्वी जयस्वालचे केवळ चार धावांनी अर्धशतक या सामन्यात हुकले आणि तो ४६ धावांवर बाद झाला. तेव्हा सरफराज खान क्रीजवर आला. त्यानंतर त्याने त्याचा भाऊ मुशीर खानसोबत ९३ धावांची भागीदारी केली. मुशीरने ६६ चेंडूत ६० धावा केल्या. सरफराजने ३६ व्या षटकात आपले शतक पूर्ण केले. फलंदाज अखेर दर्शन मिसाळच्या चेंडूवर १५७ धावांवर बाद झाला. सरफराज खानने त्याच्या डावात ९ चौकार आणि १४ षटकार मारले.

या शतकानंतर, सर्फराज खानला आशा असेल की निवडकर्ते न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याला संघात समाविष्ट करतील. न्यूझीलंडविरुद्ध भारताचा एकदिवसीय संघ ३ किंवा ५ जानेवारी रोजी जाहीर होण्याची अपेक्षा आहे.

सरफराजच्या १५७ धावा, यशस्वी जयस्वालच्या ४६ धावा, मुशीर खानच्या ६० धावा आणि हार्दिक तामोरेच्या २८ चेंडूत ५३ धावा यामुळे मुंबईने ५० षटकांत ८ विकेट्स गमावून एकूण ४४४ धावा केल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande