बांग्लादेशात ४.१ तीव्रतेचा भूकंप
ढाका, 4 डिसेंबर (हिं.स.)। बांगलादेशमध्ये गुरुवारी (4 डिसेंबर) सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.1 नोंदवण्यात आली आहे. या भूकंपाचा परिणाम राजधानी ढाका आणि शेजारच्या जिल्ह्यांमध्ये दिसून आला. सकाळी साधारण 6 वाजून 14 मि
इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर 6.4 तीव्रतेचा भूकंप


ढाका, 4 डिसेंबर (हिं.स.)। बांगलादेशमध्ये गुरुवारी (4 डिसेंबर) सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.1 नोंदवण्यात आली आहे. या भूकंपाचा परिणाम राजधानी ढाका आणि शेजारच्या जिल्ह्यांमध्ये दिसून आला. सकाळी साधारण 6 वाजून 14 मिनिटांनी जाणवलेल्या या हलक्या धक्क्यांमुळे लोक घराबाहेर पडले, पण यामध्ये आतापर्यंत कोणत्याही प्रकारची हानी झाल्याची माहिती मिळालेली नाही.

युरोपीय–भूमध्यसागरीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार, या भूकंपाचे केंद्र नरसिंगदी जिल्ह्यात जमिनीपासून सुमारे 30 किलोमीटर खोल होते. कमी खोलीमुळे धक्के तीव्र नव्हते, त्यामुळे कोणतीही मोठी अडचण निर्माण झाली नाही. शहरात आणि आसपासच्या भागांत कंपन जाणवल्यावर लोक काही क्षण घाबरले. ढाका प्रशासनाने सांगितले की कोणत्याही इमारतीला भेगा पडल्याची किंवा कुणी जखमी झाल्याची एकही नोंद नाही.

गेल्या काही दिवसांपासून सतत भूकंपीय हालचाली सुरू असल्यामुळे लोक सतर्क झाले आहेत; मात्र यावेळी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात राहिली. भूविज्ञान तज्ज्ञांचे म्हणणे आहे की बांगलादेश तीन प्रमुख टेक्टॉनिक प्लेट्सच्या संगमावर स्थित असल्यामुळे हा परिसर नेहमीच भूकंपाच्या धोक्यात असतो. ढाकाला जगातील त्या शहरांमध्ये गणले जाते, जिथे भूकंपाचा धोका सातत्याने उच्च स्तरावर असतो. जुन्या भागांतील जीर्ण इमारती हा धोका आणखी वाढवतात, कारण अगदी हलके धक्केही त्या इमारतींना नुकसान पोहोचवू शकतात.

दरम्यान,याआधी एका महिन्यापूर्वी आलेल्या 5.7 तीव्रतेच्या भूकंपाने बांगलादेशातील अनेक प्रदेश हलवून सोडले होते. त्या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला होता आणि अनेक घरांच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या. ढाका आणि नरसिंगदी दरम्यानच्या भागात त्या वेळी मोठे नुकसान झाले होते. हा संपूर्ण परिसर ऐतिहासिकदृष्ट्या भूकंपप्रवण राहिला आहे. 1869 ते 1930 दरम्यान येथे 7.0 पेक्षा जास्त तीव्रतेचे 5 मोठे भूकंप नोंदवले गेले होते. वैज्ञानिकांचे मत आहे की भविष्यातही मोठ्या भूकंपाची शक्यता नाकारता येत नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande