
मुुंबई, 4 डिसेंबर, (हिं.स.)। अमृतांजन हेल्थकेअर लिमिटेड ही देशातील आरोग्य सेवा आणि वेलनेस क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी आहे. ही कंपनी गेली कित्येक वर्ष ग्राहकांना उच्च दर्जाच्या सेवा देत असल्याने विश्वासार्ह कंपनी म्हणून ओळखली जाते. प्रत्येक माणसाला निरोगी आरोग्याचे महत्त्व समजावून देण्यासाठी आता अमृतांजन कंपनीने नवी भागीदारी जाहीर केली आहे. अमृतांजन हेल्थकेअर लिमिटेड कंपनी आता बिग बॉस कन्नड १२ सोबत अधिकृत हेल्थ एण्ड वेलनेस पार्टनर म्हणून सहकार्य करेल. या सहकार्याच्या माध्यमातून अमृतांजन प्रेक्षकांना आरोग्याच्या टिप्स दिल्या जातील. आरोग्याविषयीची जागरुकता, वेलनेसचे महत्त्व आणि योग्य जीवनशैलीचे महत्त्व समजावून दिले जाईल. या भागीदारीमुळे ब्रँण्डला दक्षिण भारतातील प्रेक्षकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचण्याची संधी लाभली आहे.
गेल्या १३० वर्षांहून अधिक काळ अमृतांजन देशातील जवळपास प्रत्येक घरात वापरले जाते. वृद्धांपासून ते तरुण पिढीने अमृतांजनच्या वेदनाशमक उत्पादनांवर कायमच विश्वास ठेवला. तरुण आणि धावत्या जीवनशैलीतही आजची तरुण पिढी अमृतांजनची उत्पादने हमखास वापरते. अमृताजंनच्या नव्या भागीदारीमुळे पारंपरिक प्रथेला आता आधुनिक गरजांची जोड मिळण्याची प्रक्रिया अजूनच सोप्पी होईल. कंपनीची आपल्या ग्राहकांना वेदनाकाळात आराम देण्याची कटिबद्धता आता दक्षिण भारतापर्यंतही व्यापक प्रमाणात पोहोचेल. दक्षिण भारतात बिग बॉस कन्नड मोठ्या प्रमाणात पाहिला जातो. त्यामुळे कंपनीचा संदेश व्यापक स्तरावर पोहोचेल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला.
बिग बॉसच्या घरातल सहभागी स्पर्धेक दिवसभरात धावपळीची दैनंदिन कामे करतात. त्यांना दररोज नवनव्या आव्हांनाना सामोरे जावे लागते. वेगवेगळ्या उपक्रमात सहभाग घ्यावा लागतो. एकाच छताखाली २४ तास वावारणा-या स्पर्धकांना दिवसभराच्य धकाधकीनंतर आरामाची गरज भासते. तणावपूर्ण वातावरणात अमृतांजनचा फास्ट रिलॅक्सेशन रोल-ऑन तणाव, झोपेची कमतरता आणि सततच्या तीव्र प्रकाशाच्या संपर्कात आल्याने डोकेदुखीच्या तक्रारीपासून जलद आराम देतो. अमृतांजनती बॅकपेन रोल-ऑनमधील कॅपसाइझिनची सौम्य उबही फायदेशीर ठरते. बॅकपेन रोलऑनमुळे पाठदुखी आणि स्नायूंवरचा ताण कमी होतो. हे काळजीचे छोटेसे क्षणही वापरकर्त्यांना मोठा दिलासा देतात. आधुनिक धावपळीच्या जीवनशैलीत अमृतांजनची विश्वासार्ह उत्पादने आजही ग्राहकांना आराम देण्यासाठी उपयुक्त आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध होते.
बिग बॉस कन्नड १२ सोबत केलेल्या भागीदारीबद्दल अमृतांजन हेल्थकेअरचे मुख्य विपणन अधिकारी श्री. मणी भगवतीश्वरन यांनी माहिती दिली. ते म्हणाले, अमृतांजनने गेल्या १०० अधिक काळ लाखो जणांना वेदना आणि तणावापासून मुक्ती दिली आहे. त्यांचा थकवा दूर केला आहे. बिग बॉस कन्नडासोबतही ही भागीदारी आजच्या जलद, भावनिक आणि अनपेक्षित वळणांनी भरलेल्या जीवनशैलीतही आमची ग्राहकांप्रतीची काळजी योग्यरित्या पोहोचवते. आताची जनरेशन झीचा पहिल्यांदाच अमृतांजनशी परिचय होत असेल किंवा काहीजण बालपणापासूनच या ब्रँण्डची उत्पादने वापरत असतील तरीही प्रत्येक पिढीला अमृतांजनाच्या उत्पादनांनी आराम दिला आहे. ही भागीदारी अमृतांजनच्या उत्पादनांमुळे प्रत्येक पिढीला मिळणारा आराम दर्शवते. अमृतांजनची उत्पादनांचा वापर आजही फायदेशीर ठरतो.
बिग बॉस कन्नडच्या घरात प्रत्येक दिवसागणिक वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन होईल. याप्रसंगी आव्हानात्मक कृतींमध्ये सहभाग घेणा-या प्रत्येक स्पर्धकाला अमृतांजनची उत्पादने उपयुक्त ठरतील. लोकांच्या दैनंदिन धकाधकीच्या जीवनातील प्रत्येक प्रसंगात अमृतांजनची सोबत मिळते. प्रत्येक पिढीतील वाईट किंवा आव्हानात्मक काळात लोकांना दिलासा देण्याची अमृतांजनची वचनबद्धती या भागीदारीतून अधोरेखित होते. ग्राहकांना आराम देणे हीच ब्रँण्डची खरी ताकद आणि परंपरा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर