
जळगाव, 4 डिसेंबर (हिं.स.) लग्नसराईची धामधूम सुरु असतानाच सोने-चांदीच्या किंमतींत चढ उतार पाहायला मिळत आहे. जळगाव सराफ बाजारात बुधवारी सोने दरात नोंदविण्यात आली होती. मात्र आज गुरूवारी सकाळी बाजार उघडल्यावर सोन्याच्या दरात घट नोंदवली गेली. यामुळे लग्नाच्या खरेदीची तयारी करणाऱ्या ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.
जळगाव सराफ बाजारात बुधवारी ११३३ रूपयांची वाढ नोंदवण्यात आल्याने सोने तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ३२ हजार ५६१ रूपयांपर्यंत पोहोचले होते. गुरूवारी सकाळी बाजार उघडल्यावर पुन्हा ९२७ रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ३१ हजार ६३४ रूपयांपर्यंत खाली आले.दुसरीकडे चांदी दरात पुन्हा एकदा वाढ झालीय. बुधवारी चांदी दरात १०३० रूपयांची वाढ नोंदवली गेली होती. आज गुरूवारी सकाळी बाजार उघडल्यावर आणखी १०३० रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदी जीएसटीसह प्रति किलो एक लाख ८५ हजार ४०० रूपयांपर्यंत वधारली.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर