अमेरिकेचे लढाऊ विमान एफ-१६ प्रशिक्षण मोहिमेदरम्यान कोसळले
वॉशिंग्टन, 4 डिसेंबर (हिं.स.)।अमेरिकेच्या वायुसेनेच्या एलिट थंडरबर्ड्स डेमोन्स्ट्रेशन स्क्वॉड्रनमधील सर्वात घातक लढाऊ विमानांपैकी एक असलेले एफ-16 दक्षिण कॅलिफोर्नियाच्या वाळवंटात कोसळले.या दुर्घटनेबाबत माहिती देताना सैन्याने सांगितले की, विमान खाली
अमेरिकेचे लढाऊ विमान एफ-१६ प्रशिक्षण मोहिमेदरम्यान  कोसळले


वॉशिंग्टन, 4 डिसेंबर (हिं.स.)।अमेरिकेच्या वायुसेनेच्या एलिट थंडरबर्ड्स डेमोन्स्ट्रेशन स्क्वॉड्रनमधील सर्वात घातक लढाऊ विमानांपैकी एक असलेले एफ-16 दक्षिण कॅलिफोर्नियाच्या वाळवंटात कोसळले.या दुर्घटनेबाबत माहिती देताना सैन्याने सांगितले की, विमान खाली येण्यापूर्वीच एअरफोर्सचा पायलट सुरक्षितरीत्या बाहेर पडला.

दुर्घटनेत पायलटला किरकोळ दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अमेरिकन एअरफोर्सने एका निवेदनात सांगितले की एफ-16C फायटिंग फाल्कन हे विमान गुरुवारी सकाळी सुमारे 10.45 वाजता कॅलिफोर्नियाच्या नियंत्रित हवाई क्षेत्रात प्रशिक्षण मोहिमेदरम्यान कोसळले. फायर डिपार्टमेंटने सांगितले की लॉस एंजिल्सपासून सुमारे 290 किलोमीटर उत्तरेला असलेल्या मोजावे वाळवंटातील ट्रोना परिसराजवळ विमान आपत्कालीन परिस्थितीची माहिती मिळाली होती. माहिती मिळताच विभागाने तात्काळ प्रतिसाद दिला.

कॅलिफोर्नियाच्या वाळवंटात झालेल्या या विमान अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली आहे आणि पुढील माहिती 57व्या विंग पब्लिक अफेअर्स ऑफिसकडून देण्यात येईल. यापूर्वी 2022 मध्येही ट्रोना परिसरात नौदलाचे एक एफ/ए-18E सुपर हॉर्नेट विमान कोसळले होते, ज्यात पायलटचा मृत्यू झाला होता. वायुसेनेने सांगितले आहे की अपघाताच्या कारणांची चौकशी सुरू आहे.

अमेरिकन एअरफोर्सचे डझनभराहून अधिक फाइटर जेट—ब्लू एंजेल्स आणि थंडरबर्ड्स—गेल्या दशकात क्रॅश झाले आहेत. अमेरिका एफ-16 थंडरबर्ड्स एफ-16 फाल्कन,एफ-22 रॅप्टर आणि ए-10 फायटर जेटदेखील गमावले आहेत. मात्र, अमेरिकन एअरफोर्स आता एफ-35 लढाऊ विमानांचा नवा ताफा वापरत आहे. हे एफ-16 चे उन्नत रूप मानले जाते. यासोबतच एफ-47 फायटर जेट तयार करण्याचे कामही डोनाल्ड ट्रम्प प्रशासन करत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande