पाकिस्तानी शाळांमध्ये हिंदू विद्यार्थिनींवर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव
इस्लामाबाद , 5 डिसेंबर (हिं.स.)।पाकिस्तानातील शाळांमध्ये हिंदू विद्यार्थिनींवर धर्मांतराचा दबाव टाकला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील अनेक हिंदू विद्यार्थिनींनी आरोप केला आहे की शिक्षण चालू ठेवायचे असेल, तर
पाकिस्तानी शाळांमध्ये हिंदू विद्यार्थिनींवर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव


इस्लामाबाद , 5 डिसेंबर (हिं.स.)।पाकिस्तानातील शाळांमध्ये हिंदू विद्यार्थिनींवर धर्मांतराचा दबाव टाकला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील अनेक हिंदू विद्यार्थिनींनी आरोप केला आहे की शिक्षण चालू ठेवायचे असेल, तर त्यांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले जात आहे. या आरोपांनंतर पाकिस्तान सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत.

नोव्हेंबरच्या अखेरीस, सिंधच्या मीरपूर सकरो येथील सरकारी हायस्कूलमध्ये काही हिंदू विद्यार्थिनींच्या पालकांनी आरोप केला की शाळेच्या मुख्याध्यापिकेने कथितरीत्या हिंदू विद्यार्थिनींना शिक्षण सुरू ठेवण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगितले होते. आरोप असा आहे की हिंदू विद्यार्थिनींना कलमा म्हणण्यास भाग पाडले जात आहे आणि त्यांच्या धर्माची थट्टा केली जात आहे. काही विद्यार्थिनींना इस्लाम स्वीकारण्यास किंवा कलमा म्हणण्यास नकार दिल्यावर घरी पाठवले गेले, असेही पालकांचे म्हणणे आहे.

सिंध प्रांताचे धार्मिक व्यवहार राज्यमंत्री कीसो मल खेळदास यांनी गुरुवारी सेनेटला सांगितले की सरकारने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. सिंधचे शिक्षणमंत्री सैयद सरदार अली शाह यांचे प्रवक्ते यांनीही याची पुष्टी केली की सत्य जाणून घेण्यासाठी मीरपूर सकरो येथे एक समिती पाठवण्यात आली आहे. त्यांनी शुक्रवारी सांगितले, “समितीच्या सदस्यांनी प्रभावित विद्यार्थिनी, त्यांचे पालक, शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत.”

प्रवक्त्यांनी सांगितले की कोणालाही धमकावून धर्म बदलण्यास भाग पाडणे कायदेशीरदृष्ट्या मान्य नाही. सिंध प्रांतात पाकिस्तानातील सर्वाधिक हिंदू लोकसंख्या आहे. सिंधमध्ये याआधीही हिंदू मुलींना पळवून नेणे आणि त्यांचे अधिक वयाच्या मुस्लिम पुरुषांशी जबरदस्ती विवाह लावण्याच्या घटना घडत आल्या आहेत. मानवाधिकार संघटनांच्या अंदाजानुसार, पाकिस्तानात दरवर्षी १,००० पेक्षा जास्त अल्पसंख्याक मुलींना जबरदस्ती धर्मांतरित केले जाते, ज्यापैकी बहुसंख्य मुली सिंधमधील दलित हिंदू समाजातील असतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande