रिअलमी P4x 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च
मुंबई, 5 डिसेंबर, (हिं.स.)। रिअलमीने भारतीय बाजारात आपला नवीन P सिरीज स्मार्टफोन रिअलमी P4x 5G सादर केला असून, दमदार बॅटरी, जलद चार्जिंग आणि उच्च रिफ्रेश रेट डिस्प्ले यांसारख्या फीचर्समुळे हा फोन मिड-रेंज सेगमेंटमध्ये आकर्षण ठरत आहे. तीन आकर्षक रंग
Realme P4x 5G Smartphone


मुंबई, 5 डिसेंबर, (हिं.स.)। रिअलमीने भारतीय बाजारात आपला नवीन P सिरीज स्मार्टफोन रिअलमी P4x 5G सादर केला असून, दमदार बॅटरी, जलद चार्जिंग आणि उच्च रिफ्रेश रेट डिस्प्ले यांसारख्या फीचर्समुळे हा फोन मिड-रेंज सेगमेंटमध्ये आकर्षण ठरत आहे. तीन आकर्षक रंगांमध्ये– मॅट सिल्व्हर, एलेगंट पिंक आणि लेक ग्रीन – उपलब्ध असलेला हा फोन डिझाइनसह परफॉर्मन्सचा उत्तम संगम देतो.

रिअलमी P4x 5G ची किंमत भारतात बेस 6GB RAM + 128GB स्टोरेज मॉडेलसाठी 15,499 रुपये ठेवण्यात आली आहे. 8GB + 128GB प्रकाराची किंमत 16,999 रुपये तर 8GB + 256GB मॉडेलची किंमत 17,999 रुपये आहे. लॉन्च ऑफरअंतर्गत बेस मॉडेल 13,499 रुपये या कमी किमतीत उपलब्ध होणार आहे. या स्मार्टफोनची विक्री 12 डिसेंबरपासून दुपारी 12 वाजता फ्लिपकार्ट आणि रिअलमीच्या अधिकृत ऑनलाइन स्टोअरवर सुरू होईल.

हा ड्युअल सिम स्मार्टफोन रिअलमी UI 6.0 वर आधारित असून, यात 6.72 इंच FHD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. 144Hz पर्यंतचा रिफ्रेश रेट आणि 1,000 निट्स पीक ब्राइटनेसमुळे स्क्रोलिंग, गेमिंग आणि व्हिडिओ पाहण्याचा अनुभव अधिक स्मूथ होतो. फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 Ultra हा 6nm ऑक्टा-कोर चिपसेट दिला असून, 8GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंत स्टोरेजसोबत 18GB पर्यंत व्हर्च्युअल RAM सपोर्ट देखील मिळतो.

कॅमेराच्या बाबतीत, फोनच्या मागील बाजूस 50 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेल सेकंडरी सेन्सर असा ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. तर सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. IP64 रेटिंगमुळे धूळ आणि हलक्या पाण्याच्या शिंतोड्यांपासून फोनचे संरक्षण होते. याशिवाय 5300mm² व्हेपर चेंबर, स्टील प्लेट आणि कॉपर-ग्रेफाइट कोटिंग असलेली फ्रोजन क्राउन कूलिंग सिस्टम थर्मल परफॉर्मन्स अधिक स्थिर ठेवते.

कनेक्टिव्हिटीमध्ये 5G, ब्लूटूथ, वाय-फाय, जीपीएस, GLONASS, Galileo, BeiDou, QZSS तसेच यूएसबी टाइप-सी पोर्ट यांचा समावेश असून, फोनमध्ये ड्युअल स्पीकर्स दिले आहेत. या डिव्हाइसची सर्वात मोठी ताकद म्हणजे 7,000mAh क्षमतेची मोठी बॅटरी, जी 45W फास्ट चार्जिंग, बायपास चार्जिंग आणि रिव्हर्स वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. फक्त 8.39mm जाडी आणि 208 ग्रॅम वजन असल्याने मोठी बॅटरी असूनही फोन हातात संतुलित वाटतो. सर्व मिळून, रिअलमी P4x 5G हा दमदार बॅटरी, उच्च रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि सक्षम प्रोसेसरमुळे बजेट ते मिड-रेंज स्मार्टफोन शोधणाऱ्यांसाठी एक आकर्षक पर्याय ठरू शकतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande