
मुंबई, 5 डिसेंबर, (हिं.स.)। रीयलमीने भारतात आपला नवीन स्मार्टवॉच रिअलमी वॉच ५ सादर केला असून मोठा अमोलेड डिस्प्ले, इंडिपेंडंट जीपीएस आणि सुधारित हेल्थ-फिटनेस फीचर्ससह हा वॉच कंपनीच्या एआयओटी लाइनअपमधील एक महत्त्वाची भर मानली जात आहे. हे वॉच रीयलमी P4x 5G हँडसेटसोबत देशात लाँच करण्यात आला. कंपनीने सांगितले की हे स्मार्टवॉच भारतातच तयार करण्यात आल असून ऑप्टिमस इलेक्ट्रॉनिक्स यांच्यासोबतच्या भागीदारीत उत्पादन करण्यात येत आहे. येत्या काही वर्षांत सर्व एआयओटी उत्पादनांचे ‘मेक इन इंडिया’ मध्ये रूपांतर करण्याच्या धोरणाचा हा एक भाग आहे.
रीयलमी वॉच 5 ची किंमत भारतात 4,499 रुपये ठेवण्यात आली असून लाँच ऑफरअंतर्गत 500 रुपयांच्या सूटीनंतर ग्राहकांना हा वॉच 3,999 रुपयांमध्ये मिळणार आहे. पहिली विक्री 10 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता रीयलमी इंडिया ई-स्टोअर, फ्लिपकार्ट आणि इतर प्रमुख रिटेल चॅनेल्सवर सुरू होणार आहे. हा स्मार्टवॉच टायटॅनियम ब्लॅक, टायटॅनियम सिल्व्हर, मिंट ब्ल्यू आणि व्हायब्रंट ऑरेंज या रंगांमध्ये उपलब्ध आहे.
नवीन रीयलमी वॉच 5 मध्ये 1.97 इंचाचा AMOLED डिस्प्ले असून 390×450 रिझोल्यूशन, 60Hz रिफ्रेश रेट आणि 600 निट्स ब्राइटनेस मिळतो. 2D फ्लॅट ग्लास कव्हर, मेटॅलिक युनिबॉडी डिझाइन आणि अॅल्युमिनियम-अलॉय क्राउनमुळे वॉचला प्रीमियम लुक मिळतो. हनीकॉम्ब स्पीकर होल्स आणि नवीन 3D-वेव्ह स्ट्रॅप हे त्याचे डिझाइन फीचर्स अधिक आकर्षक बनवतात.
हा स्मार्टवॉच ब्लूटूथ कॉलिंग, NFC आणि 300 पेक्षा जास्त कस्टमायझेबल वॉच फेसेसला सपोर्ट करतो. स्वतंत्र GPS तंत्रज्ञानासह पाच GNSS सिस्टिमचा आधार देण्यात आला आहे. फिटनेससाठी 108 स्पोर्ट्स मोड, गाईडेड वर्कआउट्स, स्ट्रेचिंग टूल्स आणि रीयलमी लिंक अॅपशी सहज इंटिग्रेशनची सुविधा उपलब्ध आहे.
हेल्थ मॉनिटरींगमध्ये हार्ट रेट ट्रॅकिंग, SpO2 मोजमाप, झोपेचे विश्लेषण, स्ट्रेस ट्रॅकिंग आणि मासिक पाळी व्यवस्थापन यांसारख्या सुविधांचा समावेश आहे. तीन प्रकारचे ब्रीदिंग ट्रेनिंग मोड, म्युझिक कंट्रोल, कम्पास आणि वैयक्तिक कोच यांसारखी फीचर्सही देण्यात आली आहेत.
बॅटरी परफॉर्मन्सची बाब पाहता, रीयलमी वॉच 5 एका चार्जवर साधारण 16 दिवसांचा वापर देते, तर लाइट मोडमध्ये हा कालावधी 20 दिवसांपर्यंत वाढतो. याशिवाय वॉचला IP68 रेटिंग मिळाले असून पाणी आणि धुळीपासून संरक्षण प्रदान केले आहे.
रीयलमीचा हा नवीन स्मार्टवॉच मध्यम किमतीत प्रीमियम फीचर्स देत असल्याने भारतीय स्मार्टवॉच बाजारातील स्पर्धा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule