सोन्याचा दर पुन्हा वाढला, चांदीच्या दरात कमालीची घट
जळगाव , 5 डिसेंबर (हिं.स.)सध्या लग्नसराईचा मोसम सुरु असून मात्र याच दरम्यान सोने चांदीचे दर प्रचंड वाढले आहेत. वाढत्या भावामुळे सोन्याचे दागिने खरेदी करावे की नाही? असा प्रश्न निर्माण होतो. दरम्यान आज देखील सोने दरात वाढ झाली २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्
सोन्याचा दर पुन्हा वाढला, चांदीच्या दरात कमालीची घट


जळगाव , 5 डिसेंबर (हिं.स.)सध्या लग्नसराईचा मोसम सुरु असून मात्र याच दरम्यान सोने चांदीचे दर प्रचंड वाढले आहेत. वाढत्या भावामुळे सोन्याचे दागिने खरेदी करावे की नाही? असा प्रश्न निर्माण होतो. दरम्यान आज देखील सोने दरात वाढ झाली २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात २७० रूपयांची वाढ झाली आहे. २४ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,२९,९३० रूपये मोजावे लागतील.तर २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात २५० रूपयांची वाढ होऊन ते १,१९,१०० रुपयावर पोहोचले आहे. पुढील काळातही अजूनही सोन्याचे दर वाढू शकतात, असा सुवर्ण व्यावसायिकांचा अंदाज आहे. ऐन लग्नसराईच्या तोंडावर ही दरवाढ झाल्याने ग्राहकांचे बजेट मात्र बिघडणार आहे. सोन्याच्या भावात वाढ जरी झाली असली तरी, चांदीच्या दरात कमालीची घट झाली आहे. १ किलो चांदीच्या दरात ४,००० रूपयांची घसरण झाली आहे. १ किलो चांदी खरेदीसाठी आपल्याला १,८७,००० रूपये मोजावे लागतील. दरम्यान सध्या डॉलरच्या तुलनेत रुपयाने इतिहासात पहिल्यांदाच ९० चा टप्पा गाठला असून रूपयात सुधारणा न झाल्यास मागील उच्चांकापर्यंत पोहोचण्यासाठी चांदीला जास्त दिवस लागणार नाही,

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande