बीएमडब्ल्यू F 450 GS लवकरच भारतात होणार सादर
मुंबई, 6 डिसेंबर (हिं.स.)। प्रीमियम बाइक निर्माता बीएमडब्ल्यू मोटोराड आपली नवी बीएमडब्ल्यू एफ ४५० जीएस भारतात लवकरच सादर करण्याच्या तयारीत आहे. या बाईकची उत्सुकतेने वाट पाहिली जात होती आणि तिचे उत्पादन भारतात टीव्हीएस मोटरद्वारे करण्यात आले आहे. नु
BMW F 450 GS


मुंबई, 6 डिसेंबर (हिं.स.)। प्रीमियम बाइक निर्माता बीएमडब्ल्यू मोटोराड आपली नवी बीएमडब्ल्यू एफ ४५० जीएस भारतात लवकरच सादर करण्याच्या तयारीत आहे. या बाईकची उत्सुकतेने वाट पाहिली जात होती आणि तिचे उत्पादन भारतात टीव्हीएस मोटरद्वारे करण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या EICMA 2025 शोमध्ये या मॉडेलचे अनावरण करण्यात आले. काही माध्यमांनुसार ही बाईक 19 ते 20 डिसेंबरला होणाऱ्या इंडिया बाइक वीक 2025 मध्ये पाहायला मिळू शकते. तथापि, कंपनी तिचे अधिकृत भारतीय लॉन्च 2026 मध्ये करण्याची योजना आखत असून जानेवारी 2026 हा संभाव्य महिना मानला जात आहे.

नवी F 450 GS ही बीएमडब्ल्यूच्या अ‍ॅडव्हेंचर लाइन-अपमधील एंट्री-लेवल मोटरसायकल ठरणार आहे आणि ती G 310 GS ची जागा घेईल. बदलत्या बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन कंपनीने यात 420 सीसीचे ट्विन-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन दिले आहे. हे इंजिन 8,750 आरपीएमवर 47.3 बीएचपीची शक्ती आणि 6,750 आरपीएमवर 43 एनएमचे टॉर्क निर्माण करते. यासोबत 6-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. सर्वात लक्षवेधी फीचर म्हणजे ‘ईझी राइड क्लच’ टेक्नोलॉजी, ज्यामुळे राइडदरम्यान क्लच वापरण्याची गरज भासत नाही. हा सिस्टम नेमका कसा कार्य करतो आणि होंडाच्या ई-क्लच तंत्रज्ञानाशी त्याची तुलना कशी होते हे लॉन्चनंतर स्पष्ट होणार आहे.

फीचर्सकडे पाहता, नवीन GS मध्ये 6.5 इंचांचा रंगीत TFT डिस्प्ले, हीटेड ग्रिप्स, चार राइडिंग मोड्स, ट्रॅक्शन कंट्रोल आणि स्विचेबल ड्युअल-चॅनेल ABS अशी आधुनिक उपकरणे मिळतात. जागतिक बाजारात ही बाईक बेसिक, एक्सक्लूसिव, स्पोर्ट आणि ट्रॉफी अशा चार वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. भारतीय आवृत्तीत कोणते वेरिएंट आणले जातील याबाबत उत्सुकता आहे.

किंमतीबाबत अंदाज पाहता, बीएमडब्ल्यू एफ ४५० जीएस भारतात 4.50 ते 5.50 लाख रुपये एक्स-शोरूम दरम्यान लॉन्च होऊ शकते. बाजारात तिचा सामना KTM 390 Adventure, रॉयल एनफिल्ड हिमालयन 450 आणि होंडा NX500 यांच्यासारख्या लोकप्रिय अ‍ॅडव्हेंचर मॉडेल्सशी होणार आहे. नवीन GS या स्पर्धात्मक सेगमेंटमध्ये कितपत दमदार ठरते हे पाहणे रोचक असेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande