बजाज पल्सर N160 चे नवे व्हेरिएंट लॉन्च
मुंबई, 6 डिसेंबर (हिं.स.)। स्वदेशी वाहन निर्माती बजाज ऑटोने आपल्या लोकप्रिय मोटरसायकल बजाज पल्सर N160 चे नवे व्हेरिएंट बाजारात सादर केले असून यामध्ये गोल्ड-अ‍ॅनोडाइज्ड अपसाइड-डाउन (USD) फ्रंट फोर्क आणि सिंगल-पीस सीटचा पर्याय देण्यात आला आहे. कंपनीन
Bajaj Pulsar N160 New Variant


मुंबई, 6 डिसेंबर (हिं.स.)। स्वदेशी वाहन निर्माती बजाज ऑटोने आपल्या लोकप्रिय मोटरसायकल बजाज पल्सर N160 चे नवे व्हेरिएंट बाजारात सादर केले असून यामध्ये गोल्ड-अ‍ॅनोडाइज्ड अपसाइड-डाउन (USD) फ्रंट फोर्क आणि सिंगल-पीस सीटचा पर्याय देण्यात आला आहे. कंपनीने या व्हेरिएंटची किंमत 1,23,983 रुपये (एक्स-शोरूम) ठेवली असून हे मॉडेल देशभरातील सर्व डीलरशिपवर उपलब्ध करण्यात आले आहे.

या नव्या मॉडेलमध्ये इंजिन किंवा इतर मेकॅनिकल बाबींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यामध्ये पूर्वीप्रमाणेच 164.82 सीसीचे सिंगल-सिलेंडर इंजिन दिले असून ते 8,750 rpm वर 15.7 bhp शक्ती आणि 6,750 rpm वर 14.65 Nm टॉर्क निर्माण करते. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. सिंगल सीट असलेला हा नवीन व्हेरिएंट चार आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये पर्ल मेटॅलिक व्हाइट, रेसिंग रेड, पोलर स्काय ब्लू आणि ब्लॅकचा समावेश आहे.

स्प्लिट सीट व्हेरिएंटला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर कंपनीने मार्केट रिसर्च केले असता, पल्सर N160 खरेदी करणाऱ्यांपैकी मोठा वर्ग फॅमिली रायडर्सचा असल्याचे समोर आले. हे रायडर्स सिंगल सीटला अधिक प्राधान्य देतात, त्यामुळे गोल्ड फिनिश असलेल्या USD फोर्कसह हा नवीन पर्याय बाजारात आणण्यात आला. बजाज ऑटोच्या मोटरसायकल बिझनेस युनिटचे प्रेसिडेंट सारंग कनाडे यांनी सांगितले की, ग्राहकांच्या अभिप्रायावर आणि बदलत्या इंडस्ट्रीच्या गरजांवर आधारित या नव्या पल्सर N160ची निर्मिती करण्यात आली आहे. यामधील गोल्ड USD फोर्क आणि सिंगल सीट यामुळे आरामात वाढ होऊन बाईकला अधिक प्रीमियम लुक मिळतो.

N सिरीजची पॉवर, कंट्रोल आणि प्रिसिजन यामुळे रायडर्सना दर्जेदार राइडिंग अनुभव देणे हा यामागचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. बजाज ऑटो ही भारतातील सर्वात मोठ्या मोटरसायकल निर्यातदारांपैकी एक असून पल्सर ब्रँडने गेल्या 25 वर्षांत भारतात व आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी लोकप्रियता मिळवली आहे. नव्या व्हेरिएंटमुळे पल्सर ब्रँडची बाजारातील पकड आणखी मजबूत होईल, तसेच रोजच्या वापरासाठी योग्य असलेला हा मॉडेल स्पोर्टी आणि आक्रमक लुकमुळे पल्सरची ओळख अधिक ठळक करेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande