फ्रान्समध्ये क्रिसमस तयारी दरम्यान कारची धडक; 10 ठार, 19 जखमी
पॅरिस, 6 डिसेंबर (हिं.स.)। फ्रान्सच्या ग्वाडेलोपमध्ये क्रिसमस कार्यक्रमाच्या तयारीदरम्यान भीषण दुर्घटना घडली. सैंटे-ऐनी येथील शोएल्चर स्क्वेअरजवळ टाउन हॉल आणि चर्चसमोर सुरू असलेल्या क्रिसमस सजावटीदरम्यान एक कार अनियंत्रित होऊन लोकांच्या गर्दीत घुसल
Car crash during Christmas preparations


पॅरिस, 6 डिसेंबर (हिं.स.)। फ्रान्सच्या ग्वाडेलोपमध्ये क्रिसमस कार्यक्रमाच्या तयारीदरम्यान भीषण दुर्घटना घडली. सैंटे-ऐनी येथील शोएल्चर स्क्वेअरजवळ टाउन हॉल आणि चर्चसमोर सुरू असलेल्या क्रिसमस सजावटीदरम्यान एक कार अनियंत्रित होऊन लोकांच्या गर्दीत घुसली. या अपघातात किमान 10 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 19 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे रेडिओ कॅरिब्स इंटरनेशनेल ग्वाडेलोपने सांगितले.

घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ माजला असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अधिकाऱ्यांनी सविस्तर तपास सुरू केला असून प्राथमिक माहितीनुसार वाहनचालकाला गाडी चालवताना काही वैद्यकीय अडचण निर्माण झाली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे, मात्र त्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. अपघातानंतर चालक घटनास्थळीच थांबला होता.

घटना घडल्यानंतर अग्निशमन दल, पॅरामेडिक्स आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. शहराच्या महापौरांनीही तातडीने स्थळाला भेट देत जखमींच्या उपचारासाठी क्रायसिस टीम सक्रिय केली असून प्रभावितांना त्वरीत मदत पोहोचवण्याचे काम सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande