रेडमी 15C बजेट 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च
मुंबई, 6 डिसेंबर (हिं.स.)। टेक कंपनी रेडमीने भारतीय बाजारपेठेत आपला नवीन बजेट स्मार्टफोन ‘रेडमी 15C’ लॉन्च केला आहे. आकर्षक किंमत, दमदार बॅटरी, AI फीचर्स आणि 5G सपोर्टसह हा फोन सादर करण्यात आला असून त्याची सुरुवातीची किंमत 12,499 रुपये ठेवण्यात आली
Redmi 15C 5G Smartphone


मुंबई, 6 डिसेंबर (हिं.स.)। टेक कंपनी रेडमीने भारतीय बाजारपेठेत आपला नवीन बजेट स्मार्टफोन ‘रेडमी 15C’ लॉन्च केला आहे. आकर्षक किंमत, दमदार बॅटरी, AI फीचर्स आणि 5G सपोर्टसह हा फोन सादर करण्यात आला असून त्याची सुरुवातीची किंमत 12,499 रुपये ठेवण्यात आली आहे. रेडमीने हा स्मार्टफोन तीन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला असून डस्ट पर्पल, मूनलाइट ब्लू आणि मिडनाइट ब्लॅक या रंगांमध्ये उपलब्ध होईल. फोनची विक्री 11 डिसेंबरपासून सुरू होत आहे.

रेडमी 15C च्या डिझाइनमध्ये पॉलीकार्बोनेट मटेरियल वापरले असले तरी त्याची ग्लॉसी आणि ग्लिटरी फिनिशमुळे तो प्रीमियम लूक देतो. 212 ग्रॅम वजनाचा हा फोन हातात थोडा जड वाटतो. साइड-माऊंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर पॉवर बटणातच देण्यात आला आहे. 3.5mm हेडफोन जॅक, टाइप-C पोर्ट, माइक आणि डाउन-फायरिंग स्पीकर यांसारखी पोर्ट्स खालच्या भागात आहेत. यात ट्रिपल-स्लॉट सिम ट्रे असून दोन सिमसोबत एक मायक्रो SD कार्डचा पर्याय मिळतो. फोन IP64 डस्ट आणि स्प्लॅश रेझिस्टन्ससह येत असल्याने हलक्या पावसात किंवा पाण्याच्या शिंतोड्यात सुरक्षित राहतो. समोर 6.9 इंचांचा HD+ डिस्प्ले असून 120Hz रिफ्रेश रेटमुळे स्क्रोलिंग स्मूथ होते. 800 निट्स पीक ब्राइटनेस आणि TUV सर्टिफिकेशनमुळे दीर्घकाळ वापरातही डोळ्यांना त्रास होत नाही. मात्र वॉटरड्रॉप नॉचची रचना थोडी जुनी वाटते.

फोनची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची 6000mAh क्षमता असलेली मोठी बॅटरी. बॅटरी बॅकअपमध्ये 19 तास 18 मिनिटांचा PCMark स्कोअर मिळाल्याचे कंपनीने सांगितले आहे. 33W फास्ट चार्जिंग आणि रिव्हर्स चार्जिंगचा सपोर्टही दिला आहे. फोटोग्राफीसाठी मागील बाजूस 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि AI सेकंडरी लेन्स दिली असून सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.

रेडमी 15C मध्ये 6nm प्रक्रियेवर आधारित मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे, जो 2.4GHz पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर कार्य करतो. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 15 वर आधारित हायपर OS 2 वर चालतो. कनेक्टिव्हिटी फीचर्समध्ये वायफाय, ब्लूटूथ, NFC, इन्फ्रारेड सेन्सर तसेच 3.5mm हेडफोन जॅकचा समावेश आहे. परवडणाऱ्या किंमतीत दमदार परफॉर्मन्स, दीर्घकाळ साथ देणारी बॅटरी आणि 5G सपोर्टमुळे रेडमी 15C बजेट सेगमेंटमध्ये आकर्षक पर्याय ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande