बंगालादेश : खालिदा झिया यांना एअर ऍम्बुलन्सने लंडनला नेणार
ढाका, 8 डिसेंबर (हिं.स.)।गंभीर आजारी असलेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांना उपचारासाठी लंडनला नेण्यासाठी एअर ऍम्बुलन्स उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही एअर ऍम्बुलन्स उद्या, मंगळवारी ढाकामध्ये उतरणार आहे, अशी माहिती विमान वाहतूक अधिक
खालिदा झिया यांची प्रकृती चिंताजनक, लंडनला जाण्याची तयारी पुन्हा पुढे ढकलली


ढाका, 8 डिसेंबर (हिं.स.)।गंभीर आजारी असलेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांना उपचारासाठी लंडनला नेण्यासाठी एअर ऍम्बुलन्स उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही एअर ऍम्बुलन्स उद्या, मंगळवारी ढाकामध्ये उतरणार आहे, अशी माहिती विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी दिली.

बांगलादेश नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाच्या (सीएएबी ) एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले की या विमानाला मंगळवारी सकाळी आठ वाजता उतरायची वेळ दिली आहे आणि त्याच दिवशी रात्री नऊ वाजता ते लंडनसाठी उड्डाण करेल. माहितीनुसार, ही एअर अॅम्बुलन्स कतार सरकारने उपलब्ध करून दिली आहे, जी जर्मनीस्थित विमानन समूह एफएआय कडून भाड्याने घेतली आहे. आधीच्या योजनेनुसार एफएआय ने मंगळवारी उतरून बुधवारी लंडनला उड्डाण करण्याची परवानगी मागितली होती.

ढाक्यातील कतार दूतावासाने सांगितले की बदललेली एअर ऍम्बुलन्स — बॉम्बार्डियर चॅलेंजर (CL-60 सीरीज) — पूर्णपणे अतिदक्षता उपचारासाठी लागणाऱ्या उपकरणांनी सुसज्ज आहे. यात वेंटिलेटर, मॉनिटर, इन्फ्यूजन पंप आणि ऑक्सिजन प्रणाली आहे, तसेच डॉक्टर, नर्स आणि पॅरामेडिक्सचा ताफा आहे, जे हवाई प्रवासादरम्यान गहन उपचार देण्यासाठी प्रशिक्षित आहेत.

खालिदा झिया (80 वर्षे) या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) च्या अध्यक्षा आहेत. त्या ढाक्यातील एव्हरकेअर रुग्णालयात गेल्या दोन आठवड्यांपासून विविध आजारांवर उपचार घेत आहेत. खालिदा झिया यांना एअर ऍम्बुलन्सने शुक्रवारी सकाळी रवाना होण्याची अपेक्षा होती. परंतु नंतर बीएनपी ने सांगितले की तांत्रिक अडचणींमुळे विमानाच्या आगमनात विलंब झाला आहे.

ही एअर ऍम्बुलन्स कतारच्या अमीर यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. रविवारी त्यांचा प्रवास पुढे ढकलण्यात आला, कारण त्या अजूनही लांब प्रवासासाठी तंदुरुस्त नाहीत. त्यांचे खासगी डॉक्टर आणि बीएनपी स्थायी समितीचे सदस्य डॉ. ए.जी.एम. जाहिद हुसेन यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले होते की खालिदा झिया यांचा लंडन प्रवास अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. मात्र आता मंगळवारी त्यांना उपचारासाठी लंडन येथे नेण्यात येणार आहे. यापूर्वी खालिदा झिया यांना जानेवारी महिन्यात कतारच्या अमीर यांच्या खासगी बेड्यातील एअर ऍम्बुलन्सने लंडनला नेण्यात आले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande