कंबोडिया-थायलंडमध्ये पुन्हा हवाई हल्ले सुरू ; एका थाई सैनिकाचा मृत्यू
बँकॉक , 8 डिसेंबर (हिं.स.)।थायलंडने कंबोडियासोबतच्या वादग्रस्त सीमार्शेत्रात हवाई हल्ले सुरू केले आहेत. थाई लष्करी अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले की ही कारवाई त्या वेळी करण्यात आली, जेव्हा दोन्ही देशांनी एकमेकांवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्
कंबोडिया-थायलंडमध्ये पुन्हा हवाई हल्ले सुरू ; एका थाई सैनिकाचा मृत्यू


बँकॉक , 8 डिसेंबर (हिं.स.)।थायलंडने कंबोडियासोबतच्या वादग्रस्त सीमार्शेत्रात हवाई हल्ले सुरू केले आहेत. थाई लष्करी अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले की ही कारवाई त्या वेळी करण्यात आली, जेव्हा दोन्ही देशांनी एकमेकांवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने झालेल्या संघर्षविराम कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. थाई सेनेच्या निवेदनानुसार, पूर्वेकडील उबोन रत्चाथानी प्रांतातील दोन भागांत झालेल्या ताज्या चकमकींत एका थाई सैनिकाचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. सेनेने सांगितले की त्यांच्या जवानांवर कंबोडियाच्या बाजूने गोळीबार झाला, त्यानंतर त्यांनी कंबोडियाच्या अनेक लष्करी ठिकाणांवर हवाई हल्ले सुरू केले.

दरम्यान, कंबोडियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की थाई सेनेने आज सकाळी त्यांच्या दोन लष्करी ठिकाणांवर हल्ले केले. मंत्रालयाचा दावा आहे की मागील अनेक दिवसांपासून थाई सेना उचकावणारी कृत्ये करत होती आणि कंबोडियाई सैनिकांनी प्रत्युत्तरात्मक कारवाई केलेली नव्हती. मागील महिन्यात झालेल्या एका लँडमाइन स्फोटात थायलंडचा एक सैनिक जखमी झाला होता. त्यानंतर थाई सरकारने कंबोडियासोबतचा संघर्षविराम करार स्थगित केला होता. थाई सेनेने सांगितले की सीमेजवळील चार जिल्ह्यांतून तीन लाख 85 हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे आणि आतापर्यंत 35 हजारांहून अधिक लोक तात्पुरत्या छावण्यांमध्ये पोहोचले आहेत.

दोन्ही देशांमध्ये जुलै महिन्यात तणाव वाढला होता आणि पाच दिवस संघर्ष चालला. त्यानंतर मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम आणि ट्रम्प यांच्या मध्यस्थीने संघर्षविराम करण्यात आला. ऑक्टोबरमध्ये क्वालालंपुर येथे दोन्ही देशांनी विस्तारित शांतता करारावर स्वाक्षऱ्या केल्या. जुलैतील संघर्षात 48 जणांचा मृत्यू झाला होता आणि सुमारे तीन लाख लोकांना तात्पुरते विस्थापित व्हावे लागले होते. त्या वेळी दोन्ही देशांनी जड तोफखाना आणि रॉकेटचा वापर केला होता.

थायलंड आणि कंबोडियामधील 817 किलोमीटर लांबीची जमीनसीमा शंभर वर्षांपासून वादग्रस्त आहे. या सीमारेषेच्या काही भागांवर सार्वभौमत्वाचा वाद आहे. 1907 मध्ये फ्रान्सने कंबोडियावर राज्य करत असताना प्रथमच या सीमारेषेचा नकाशा तयार केला होता. त्यानंतर अनेक वेळा तणाव वाढला आहे. 2011 मध्ये एका आठवड्यापर्यंत तोफांची लढाई झाली होती. तरीही दोन्ही देश हा वाद शांततापूर्ण मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न करत आले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande