ईस्लापूर: शिवणी परिसरातून गांजाची झाडे जप्त
नांदेड, 8 डिसेंबर (हिं.स.)। शिवणी परिसरातील शेतशिवारात तुरीच्या पिकात गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला. सपोनि. उमेश भोसले यांनी पथकासह छापा टाकला असता गजानन नारायण आडे (वय ५५) यांच्या शेतातून १६ किलो ५० ग्रॅम वजनाची (किंमत १ लाख ६० हजार रु
ईस्लापूर: शिवणी परिसरातून गांजाची झाडे जप्त


नांदेड, 8 डिसेंबर (हिं.स.)।

शिवणी परिसरातील शेतशिवारात तुरीच्या पिकात गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला. सपोनि. उमेश भोसले यांनी पथकासह छापा टाकला असता गजानन नारायण आडे (वय ५५) यांच्या शेतातून १६ किलो ५० ग्रॅम वजनाची (किंमत १ लाख ६० हजार रुपये) गांजाची झाडे जप्त केली आहेत.

किनवट तालुक्यातील शिवणी परिसरात ही कारवाई करण्यात आली. पथकाला शेतात सुका गांजा तसेच तुरीच्या ताशात लपवलेली हिरवी गांजाची झाडे आढळली.

ही कारवाई पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, उपविभागीय पोलिस अधिकारी बोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. उमेश भोसले, सपोउपनि. कांगणे, ओम डीडेवार, साखरे, कॉन्स्टेबल, होमगार्ड व इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande